तिवरे धरण फुटलं; 23 जण बेपत्ता, ही आहेत नावं Maharashtra | Ratnagiri| Tiware dam| Dam Breached | Chiplun

तिवरे धरण फुटलं; 23 जण बेपत्ता, ही आहेत नावं Maharashtra | Ratnagiri| Tiware dam| Dam Breached | Chiplun

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण काल (मंगळवारी) रात्री 8 ते 9च्या सुमारास ही घटना घडली.

  • Share this:

चिपळूण, 03 जुलै: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण काल (मंगळवारी) रात्री 8 ते 9च्या सुमारास ही घटना घडली. यात 23 ते 25 जण वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे. धरणाच्या पायथ्याशी असेलले भेंडेवाडी नावाची वाडी वाहून गेली आहे. या गावातील 25 जण वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे. यातील तिघांचे मृतदेह सापडले आहेत.

वाचा- चिपळूणमधील तिवरे धरण फुटले; 25 जण बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले

बेपत्ता गावातील नावे

अनंत हरिभाऊ चव्हाण (63)

अनिता अनंत चव्हाण (58)

रणजित अनंत चव्हाण (15)

ऋतुजा अनंत चव्हाण (25)

दुर्वा रणजित चव्हाण (15)

आत्माराम धोंडू चव्हाण (75)

लक्ष्मी आत्माराम चव्हाण (72)

नंदाराम महादेव चव्हाण (65)

पांडुरंग धोंडू चव्हाण (50)

रवींद्र तुकाराम चव्हाण (50)

रेश्मा रविंद्र चव्हाण (45)

दशरथ रविंद्र चव्हाण (20)

वैष्णवी रविंद्र चव्हाण (18)

अनुसिया सीताराम चव्हाण (70)

चंद्रभागा कृष्णा चव्हाण (75)

बळीराम कृष्णा चव्हाण (55)

शारदा बळीराम चव्हाण (48)

संदेश विश्वास धाडवे (18)

सुशील विश्वास धाडवे (48)

रणजित काजवे (30)

राकेश घाणेकर(30)

रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील चिपळूण (Chiplun) तालुक्यातील नादुरुस्त तिवरे धरण (Tiware dam) काल रात्री फुटल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री 8 ते 9च्या सुमारास ही घटना घडली असून यात 23 ते 25 जण वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे काढावरील 5 घरांचे मोठे नुकसान देखील झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. धरण फुटल्यामुळे भेंडेवाडी (तिवरे गाव) या गावावर संकट कोसळले आहे. गावातील 25 जण बेपत्ता आहेत. त्यापैकी तिघांचे मृतदेह सापडले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम भागात हे गाव आहे. घटनेची माहिती मिळता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण मध्यरात्री 2 वाजता घटना स्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले असून परिसरातील अन्य गावांना अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

VIDEO: चिपळूणमधील तिवरे धरण फुटल्यानं ग्रामस्थांवर आस्मानी संकट

First published: July 3, 2019, 7:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading