• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • कोकणातील पूर परिस्थितीचा भयावह चेहरा, NDRF च्या टीमकडून रेस्क्यूचा LIVE VIDEO

कोकणातील पूर परिस्थितीचा भयावह चेहरा, NDRF च्या टीमकडून रेस्क्यूचा LIVE VIDEO

मागील दोन दिवसांपासून कोकणात (Konkan) पावसानं थैमान (Heavy Rainfall) घातलं आहेत.

 • Share this:
  रत्नागिरी, 23 जुलै : रत्नागिरी  (ratnagiri) आणि रायगडमध्ये  (raigad) मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. ठिकठिकाणी पुराचे पाणी वाढल्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. घरात पाणी शिरल्यामुळे अनेकांचे संसार हे उघड्यावर पडले आहे. रत्नागिरीतील पावसाने हाहाकार माजवला आहे. एका घरात रेस्क्यू करत असल्याचा व्हिडीओ समोर आली आहे. मागील दोन दिवसांपासून कोकणात (Konkan) पावसानं थैमान (Heavy Rainfall) घातलं आहेत. आजही कोकणात पावसाचा जोर कायम राहणार आहे. अनेकांची घरंही पाण्याखाली गेली आहे. NDRF ची टीम बचावकार्य करत आहे. तर सैन्याचीही तुकडीही दाखल झाली आहे. NDRF च्या टीमने एका घरात अडकलेल्या लोकांची सुखरुपपणे सुटका केली आहे. घराच्या कौलार काढून घरातील सदस्यांना बाहेर यावे लागले आहे. घराभोवती पाण्याने वेढा घातल्यामुळे NDRF ची टीम थेट घराच्या छताजवळ पोहोचली आहे, यावरून शहरात पाण्याची परिस्थिती किती विदारक आहे, याचा अंदाज येऊ शकतो. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात आलेल्या पुर परिस्थितीने अनेक कुटुंबातील लोकांची वाताहत झाली आहे. रात्री अचानक घरात पुराचे पाणी शिरल्याने होत्याच नव्हतं झालं आहे. आयुष्यभर पै पै गोळा करून थाटलेला संसार या पुराने उद्धवस्त केला आहे. महिन्याभरात प्रियंका चोप्राने मुंबईतील 2 प्रॉपर्टी विकल्या; ऑफिसही दिलं भाड्याने खेड शहरात मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले त्यामुळे या पुराच्या पाण्याने बाजारपेठेची खूप हाणी झाली आहे.  त्यामुळे अनेक व्यपारी हवालदिल झाले आहेत. आता त्यांना सरकारच्या मदतीची प्रतीक्षा आहे. चिपळूणातील पूरपरिस्थिती निवळण्यास सुरुवात तर चिपळूण तालुक्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून आता हळूहळू पाणी ओसरत असल्याने मदतकार्याला वेग आला आहे.  एनडीआरएफची 2 पथके,  आर्मीचे 1 पथक, नौदलाचे 2 पथके, हवाईदलाचे 02 पथके तसेच 15 स्वयंसेवी संस्थांमार्फत बोंटीद्वारे मदत कार्य सुरू आहे.   नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.  सर्वांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
  Published by:sachin Salve
  First published: