राज्यात पावसाचं धुमशान सुरूच! तुफान माऱ्याने रस्त्याला पडलं भगदाड पाहा VIDEO

राज्यात पावसाचं धुमशान सुरूच! तुफान माऱ्याने रस्त्याला पडलं भगदाड पाहा VIDEO

तुफान पावसाच्या माऱ्याने रायगड जिल्ह्याला फटका बसला आहे. इथला एक रस्ता कसा खचला याचा VIDEO आता समोर आला आहे.

  • Share this:

रोहा, 15 ऑक्टोबर : बुधवारी मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात धुमाकूळ घातलेल्या पावसाचं थैमान गुरुवारीही सुरूच आहे. आज हे तुफान आणखी पश्चिमेकडे सरकलं. त्यामुळे रायगड जिल्ह्याला मोठा फटका बसत आहे. दुपारी 3 वाजल्यानंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने अनेक गावांत पाणी साठलं आहे. रोहा- नागोठणा रस्त्यावर तर पावसाच्या तडाख्याने मोठं भगदाड पडलं आणि एका बाजूचा रस्ताच खचला. त्यामुळे या भागातली वाहतूक थांबवण्यात आली आहे.

पावसाचा जोर बुधवारी रात्री पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात जबरदस्त होता. सोलापूर हायवे पाण्याखाली गेला होता. इंदापूर तालुक्यात या पावसाने मोठं नुकसान केलं. आता कमी दाबाचं क्षेत्र आणखी पश्चिमेकडे आणि उत्तरेकडे सरकल्याने मुंबईसह रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत संध्याकाळी पावसाला सुरुवात झाली. तर रायगड जिल्ह्यात दुपारपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.

नागोठणे ते रोहा रोडवर भिसे खिंड घाटात रस्त्यातच मोठं भगदाड पडल्याने वाहतूक थांबवली आहे. संध्याकाळी सहाच्या सुमारास रस्त्याची एक बाजू पूर्ण खचली आहे.

ऑक्टोबर महिन्याला अनपेक्षित पाऊस बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पडत आहे. हे क्षेत्र कमी तीव्रतेच्या वादळासारखंच आहे. आता हे तुफान पश्चिम आणि उत्तरेकडे सरकत अरबी समुद्रात जाणार आहे. पुढचे 48 तास कोकण किनारपट्टीसाठी धोक्याचे असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

बुधवारी रात्री पुणे शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. अनेक वस्त्या, सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं होतं. पुणे, सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने (Pune rain update) रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं. उजनी धरणाचं पाणी भिगवण, डाळज, पळसदेव, इंदापूर इथे महामार्गाववर आल्याने सोलापूर हायवेवरची (Pune Solapur highway closed) वाहतूक बुधवारी थांबवली होती. आजही नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा (weather alert) देण्यात आला आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: October 15, 2020, 8:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading