मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Maharashtra Rain Updates: मुंबईसह ठाणे आणि कोकणात उद्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भातही अलर्ट

Maharashtra Rain Updates: मुंबईसह ठाणे आणि कोकणात उद्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भातही अलर्ट

उद्या पावसाचा जोर वाढणार

उद्या पावसाचा जोर वाढणार

मुंबई, ठाणे आणि जवळच्या इतर उपनगरीय शहरांमध्ये हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे

    मुंबई, 18 ऑगस्ट: गेल्या कित्येक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसानं अक्षरशः थैमान घातलं आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसंच कोकणातही सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस पडला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. त्यात आता हवामान विभागाकडून उद्यासाठी पुन्हा अलर्ट देण्यात आले आहेत. राज्याच्या हवामान विभागानं उद्याच्या पावसासंबंधीचा अंदाज वर्तवला आहे. उद्या म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे आणि जवळच्या इतर उपनगरीय शहरांमध्ये हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच कोकण आणि कोकण किनारपट्टी भागातही हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच विदर्भातही IMD नं दिलेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत हलक्या ते माध्यम सरी कोसळल्याची चिन्हं आहेत. विदर्भातही गेल्या अनेक दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या पावसानं अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. गडचिरोली आणि भामरागड सारखे भाग पाण्याखाली गेले आहेत. या सर्व ठिकाणी NDRF कडून मदत करण्यात येत आहे. ऑरेंज अलर्ट म्हणजे काय? जेव्हा हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला तेव्हा याचा अर्थ असा होतो की हवामानाने आता अधिक खराब हवामानासाठी तयार रहावे अशी मागणी केली आहे. जेव्हा हवामान असे वळण घेते, ज्याचा परिणाम जनजीवनावर होऊ शकतो, तेव्हा हा अलर्ट जारी केला जातो. खराब हवामानामुळे तुम्ही तुमच्या प्रवासासाठी, कामासाठी किंवा शाळेतील मुलांच्या प्रवासासाठी तयार राहा. तर राज्यात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होणाऱ्या भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पावसामुळे काही ठिकाणी शेती पिकांना देखील फटका बसला आहे. तर वर्धा जिल्ह्यातही काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. मात्र पूर परिस्थिती नाही, नागरिक सुरक्षित आहेत, रस्तेही सुरळीत असल्याची माहिती आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Maharashtra News, Rain fall, Rain updates

    पुढील बातम्या