नागपूर, 28 डिसेंबर : हवामान विभागाने दिलेला इशारा अखेर खरा ठरला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने (Hailstorm) झोडपून काढले आहे. नागपूर (nagpur) जिल्ह्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तर अकोल्यातही (akola) गारपिटीने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवली आहे.
आज दुपारी नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात जलालखेडा, लोहरी सावंगा भागात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. पुढील दोन दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट होण्याचा अंदाज नागपूर वेध शाळेने वर्तविला होता. आधी पावसाने खरीपाचं नुकसान केलेलं असतानाच आता अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू झाली. नरखेड तालुक्यातील काही भागात सकाळपासून अधून मधून पडत असलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीतील पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. यात काढणीला आलेली भिजली आहे. काही शेतकऱ्यांनी हरभरा, गहु पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर तुर पिकाचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर काहींची तुर कापणीच्या तयारीत आहे या सर्व फटका हरभरा पिकला व तुरीला या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.
(महाविकास आघाडीचे 50 ते 60 आमदार नाराज, भाजप नेत्यांचा गंभीर आरोप)
तसंच जोमात असलेला गहू पिकाच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. संत्र्यांच्या बागांनाही मोठा फटका बसला आहे. ढगाळ वातावरणामुळे गहू आणि हरभऱ्यावर किडीचा प्रादुर्भाव झालाय. काही भागात पावसासह गारपीट झाल्यामुळे याचा हरभरा, गहू, संत्रा, मोसंबी व भाजीपाला पिकांवर परिणाम झाला आहे. खरीपाच्या नुकसानीतून शेतकरी सावरत असतानाच आता रब्बीवर अवकाळीचं संकट ओढवलंय.
बदललेल्या निसर्गचक्रामुळे आणि नैसर्गिक संकटांचा सामना करत शेती करणं शेतकऱ्यांसाठी अवघड होऊन बसलं आहे. पावसामुळे गारठ्यात वाढ झाली असून भाजीपाला वर्गीय पिकांवर याचा परिणाम होत आहे. 31 तारखेपर्यंत काही ठिकाणी विजेच्या कडकडाटसह हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी वादळी पावसासह गारपीटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.
(शहनाजचा डान्स video पाहून आसीमने मराला टोमणा, फॅन्स म्हणाले असं काही...)
अनेकांची संत्र्यांच्या आंब्या बहाराच्या संत्र्याची तोडणी व्हायची आहे. अश्यात वर्षभराच्या पिकाचे मोठे नुकसान होण्याची शाक्यता आहे.तर आंब्या बहाराच्या फुटीवर यांचा मोठ्या प्रमाणात परिणाम पडण्याची शक्यता आहे.दरम्यान अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
अकोल्यालाही झोडपलं
तर, अकोल्यात विजांचा कडकडाट आणि गारपिटीसह जोरदार अवकाळी पाऊस शेती पिकांचं नुकसान झालं आहे. मंगळवारी दुपारी अकोला जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि गारपीट व वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस कोसळला . या अवकाळी पावसाने शहरातील बाजारपेठांमधील व्यवहार तसेच जनजीवन विस्कळीत झाले . विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 28 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानुसार मंगळवार 28 डिसेंबर रोजी सकाळपासूनच वातावरणात बदल झालेला जाणवत होता. सकाळपासून ढगाळ वातावरण अकोला शहर व जिल्ह्यात तयार झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.