मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोकणात NDRFच्या 15 टीम तैनात

राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोकणात NDRFच्या 15 टीम तैनात

15 NDRF teams deployed in Konkan: कोकण किनारपट्टीच्या भागात पुढील काही दिवसांत अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

मुंबई, 9 जून : मुंबईसह संपूर्ण कोकणात आज दिवसभर मुसळधार पाऊस (Heavy rainfall) बरसला. या मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचं पहायला मिळालं. तर कोकणात समुद्र खूपच खवळलेला पहायला मिळालं. येत्या काही दिवसांत कोकण (Konkan) किनारपट्टीच्या भागात मुसळधार (Heavy Rainfall) ते अतिमुसळधार पाऊस (Extremely heavy rain) पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील समुद्रकिनारपट्टी भागात NDRFच्या 15 टीम तैनात (15 NDRF Teams deployed in Konkan)  करण्यात आल्या आहेत.

हवामान विभागाने कोकण किनारपट्टीवर असलेल्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर राज्यसरकारने पूर्वतयारी सुरू केली आहे. समुद्र किनारपट्टीच्या भागात असेलल्या कोकणातील जिल्ह्यांत एनडीआरएफच्या 15 टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत.

Weather Alert: पुढील आठवडाभर अतिमुसळधार पावसाचा अंदाज; पाहा कुठल्या जिल्ह्यात जोरदार बरसणार

या एनडीआरएफच्या टीम्स गरज भासल्यास तात्काळ मदतीसाठी उपलब्ध होणार आहेत. तौत्के चक्रीवादळाच्या दरम्यान कोकणात एकही एनडीआरएफची टीम तैनात नव्हती आणि त्यामुळेही मोठा फटका बसला होता. त्याननंतर आता राज्य सरकारने अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी करत एनडीआरएफच्या टीम्स कोकणात तैनात केल्या आहेत.

आज मुंबईत कुठे किती पाऊस झाला?

मुंबई शहर - 102.29 मिमी

मुंबई पूर्व उपनगर - 169.17 मिमी

मुंबई पश्चिम उपनगर - 137.33 मिमी

रत्नागिरीत पाच दिवस ऑरेंज अलर्ट

रत्नागिरी जिल्ह्यात 9 जून ते 13 जून या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्यातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, या सर्व कालावधीत रत्नागिरीसह लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून सोबतच मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

First published:

Tags: Maharashtra, Rain