• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • Maharashtra Rain: विदर्भात पावसाचा तडाखा; वीज कोसळून तब्बल 52 जनावरांचा मृत्यू

Maharashtra Rain: विदर्भात पावसाचा तडाखा; वीज कोसळून तब्बल 52 जनावरांचा मृत्यू

Lighting strike in Vidarbha: विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असून वीजही कोसळत आहे.

  • Share this:
हैदर शेख, प्रतिनिधी यवतमाळ, 7 जुलै : महाराष्ट्रात गेल्या पाच-सहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने विदर्भातील जिल्ह्यांत कालपासून हजेरी (Rain in Vidarbha) लावली आहे. केवळ पाऊसच पडत नाहीये तर मोठ्याप्रमाणात वीजांचा कडकडाट सुद्दा होत आहे. विदर्भात आज वीज कोसळून तब्बल 50 हून अधिक जनावरांचा मृत्यू (lightning strike 52 animals died) झाला आहे. यवतमाळ (Yavatmal) आणि चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यांत ही घटना घडली आहे. यवतमाळमध्ये 27 बकऱ्यांचा मृत्यू यवतमाळ जिल्ह्याच्या झरी तालुक्यातील खातेरा येथे विज पडून झाडाखाली उभ्या असलेल्या 27 बकऱ्यांचा जागेवर मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. खातेरा परिसरात आभाळ दाटून आले असता दरम्यान वीजांचा कडकडाटसह जोरदार पाऊस पडला. याच दरम्यान जंगलात चरण्यासाठी गेलेल्या बकऱ्या झाडाखाली उभ्या असतांना या झाडावर वीज कोसळली. दुर्दैवाने यामध्ये 27 बकऱ्यांचा मृत्यू झाला. चंद्रपुरातही वीज कोसळून 25 जनावरांचा मृत्यू वीज पडून 25 जनावरांचा मृत्यू झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील अमलनाला येथे ही घटना घडली आहे. अमलनाला धरणाच्या सांडव्या जवळ ही गुरे चरत होती. अचानक आलेल्या पावसात वीज पडून 25 गाई-बैलांचा मृत्यू झाला आहे. सर्व जनावरे अमलनाला परिसरातील माणोली या गावातील होती. काल तिघांचा मृत्यू नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे मंगळवारी झालेल्या जोरदार पावसात वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये एक शेतकरी, गुराखी आणि एका पोलीस पाटलाचा समावेश आहे. अचानक पावसाला सुरूवात झाल्याने शेतकरी, पोलीस पाटील, मजूर आणि गुराखी यांनी शेतातील एका झोपडीत आश्रय घेतला. त्याच दरम्यान जोरदार वीज कडाडली आणि जोपडीवर कोसळली. वीज कोसळल्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Published by:Sunil Desale
First published: