मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसाचं धूमशान, दोन दिवस प्रचंड महत्त्वाचे, पाच दिवसांचा अलर्ट, पूरस्थितीचा धोका

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसाचं धूमशान, दोन दिवस प्रचंड महत्त्वाचे, पाच दिवसांचा अलर्ट, पूरस्थितीचा धोका

 राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय. अनेक ठिकाणी त्याने थैमान घालायला सुरुवात केली आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात तर अक्षरश: वैरी होवून कोसळतोय की काय अशी भीती वाटेल इतक्या जोरात पाऊस कोसळताना दिसतोय.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय. अनेक ठिकाणी त्याने थैमान घालायला सुरुवात केली आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात तर अक्षरश: वैरी होवून कोसळतोय की काय अशी भीती वाटेल इतक्या जोरात पाऊस कोसळताना दिसतोय.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय. अनेक ठिकाणी त्याने थैमान घालायला सुरुवात केली आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात तर अक्षरश: वैरी होवून कोसळतोय की काय अशी भीती वाटेल इतक्या जोरात पाऊस कोसळताना दिसतोय.

पुढे वाचा ...
    मुंबई, 7 ऑगस्ट : महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने उसंत घेतलेली होती. पण दोन आठवड्यांच्या ब्रेकनंतर पावसाने पुन्हा एन्ट्री मारली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय. अनेक ठिकाणी त्याने थैमान घालायला सुरुवात केली आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात तर अक्षरश: वैरी होवून कोसळतोय की काय अशी भीती वाटेल इतक्या जोरात पाऊस कोसळताना दिसतोय. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होईल की काय, अशी भीती सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जातेय. पावसाचं हे आक्राळविक्राळ रुप पुढच्या पाच दिवसांसाठी तसंच असू शकतं, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्याचा दिवस हा पावसासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या अलर्टनंतर प्रशासनही सतर्क झालं आहे. काही ठिकाणी खरंच नद्यांना पूर आल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे प्रशासनावरील दबाव वाढताना दिसतोय. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणात पाऊस प्रचंड धुमाकूळ घालत आहे. कोकणात तर तो धुवाँधार कोसळत आहे. त्याचं हे कोसळणं आज आणि उद्या सारखंच असणार आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज आणि उद्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार पाऊसही प्रचंड पडतोय. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात 9 ऑगस्टपासून ऑरेंज अलर्ट असणार आहे. याचा अर्थ पावसाचं प्रमाण काहीसं कमी होईल. पण पाऊस कोसळत राहणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र थोडीसी परिस्थिती वेगळी असणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्यासाठी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर त्यापुढच्या तीन दिवसांसाठी येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, मुंबई, ठाण्याची परिस्थिती काय? हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यासाठी 7 ऑगस्टसाठी येल्लो अलर्ट देण्यात आला होता. पण त्यानंतर पुढच्या चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचाच अर्थ आतापासून पुढचे चार दिवस पालघर जिल्ह्यासाठी महत्त्वाचे आहे. आगामी चार दिवसांमध्ये पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे पालघर सारखाच येल्लो अलर्ट हा ठाणे आणि मुंबईसाठी देण्यात आला आहे. त्यानंतर पुढचे चार दिवस हे ऑरेंज अलर्ट सांगण्यात आले आहेत. मुंबईसाठी फक्त 11 ऑगस्टला परिस्थिती नियंत्रणात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ('...अजितदादांना आता ते विसरावं लागेल', देवेंद्र फडणवीसांचं दिल्लीतून प्रत्युत्तर) कोल्हापूर, पुण्यातही रेड अलर्ट पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यात आजसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. तर उद्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढच्या तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे कोल्हापूरसाठी आजच्या दिवसासाठी रेड अलर्ट आणि पुढच्या दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सातारा जिल्ह्यासाठी आज आणि उद्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर त्यापुढच्या तीन दिवसांसासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरीत महाराष्ट्रात काय परिस्थिती? धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता कमी आहे. तर त्यापुढच्या तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिथे फार काही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात 9 किंवा 10 ऑगस्टसाठी येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर इतर दिवसांसाठी ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी पुढचे तीन दिवस येल्लो अलर्ट तर 10 ऑगस्टसाठी ऑरेंज अलर्ट आणि 11 ऑगस्टसाठी ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यासाठी 10 आणि 11 ऑगस्टसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Rain updates

    पुढील बातम्या