मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Monsoon Update : मान्सून परतीच्या पावसाची चाहूल, ‘या’ दिवसापासून मान्सून परतीचा प्रवास करणार

Monsoon Update : मान्सून परतीच्या पावसाची चाहूल, ‘या’ दिवसापासून मान्सून परतीचा प्रवास करणार

राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथा आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. (monsoon update)

राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथा आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. (monsoon update)

राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथा आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. (monsoon update)

  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 20 सप्टेंबर : जुलै महिन्यात सुरू झालेल्या पावसाने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात थैमान घातले. यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मात्र पावसाने राज्यातील विविध भागात जोरदार हजेरी लावली. (Monsoon Update) दरम्यान मागच्या काही दिवसांपासून राज्याती काही भागात पाऊस थांबला आहे तर काही भागात विजा, मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे.

वादळी पावसाचे सावट कायम असल्याने आज (ता. 20) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथा आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

हे ही वाचा : मुसळधार पावसादरम्यान आभाळातून कोसळलं मोठं संकट; 23 जणांनी गमावला जीव

आज (ता. 20) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाचा तसेच उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. वायव्य भारतातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक हवामान होत असून, उद्यापर्यंत (ता. 21) राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि कच्छच्या काही भागातून मान्सून माघार घेण्याची शक्यता आहे. यातच पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याला लागून समुद्र सपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

आज (ता. 20) ओडिशाच्या किनाऱ्याकडे येताना, या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. दरम्यान राज्यात विजांसह पावसाचा इशारा येलो अलर्ट नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या भागात देण्यात आला आहे.

हे ही वाचा : गंमतच झाली एका उंदराने चक्क ‘या’ स्मार्ट सिटीचा पाणीपुरवठा केला बंद

पावसाला पोषक हवामान असल्याने उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाड्यात राज्यात विजा, मेघगर्जनेसह वादळी पाऊस सुरूच आहे. कमी कालावधीत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे पाणीच पाणी होत असून, नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. सततच्या पावसाने पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. मागच्या 24 तासांत उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी ही झाली. लगतच्या देऊळगाव माळी (ता. मेहकर, जि. बुलडाणा) मंडळात अतिवृष्टी झाल्याने व पेनटाकळी प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडल्याने पैनगंगेला पूर आला. सोयाबीन, तूर, कपाशी, मका पिकांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे.

First published:

Tags: Monsoon, Rain fall, Rain flood, Weather forecast, Weather update, Weather warnings

पुढील बातम्या