मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गोंदियात रात्रीच्या अंधारात थरार, तीन मित्र आणि नाल्याला पूर, हृदयद्रावक घटना

गोंदियात रात्रीच्या अंधारात थरार, तीन मित्र आणि नाल्याला पूर, हृदयद्रावक घटना

गोंदिया तालुक्यातील तुमखेडा खुर्द गावात राहणारे तीन युवक हे लोधीटोला येथील नाल्याला आलेला पूर पाहण्यासाठी गेले असता मोठी दुर्घटना घडली.

गोंदिया तालुक्यातील तुमखेडा खुर्द गावात राहणारे तीन युवक हे लोधीटोला येथील नाल्याला आलेला पूर पाहण्यासाठी गेले असता मोठी दुर्घटना घडली.

गोंदिया तालुक्यातील तुमखेडा खुर्द गावात राहणारे तीन युवक हे लोधीटोला येथील नाल्याला आलेला पूर पाहण्यासाठी गेले असता मोठी दुर्घटना घडली.

  • Published by:  Chetan Patil
गोंदिया, 13 जुलै : राज्यभरात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक जिल्हांमध्ये नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. राज्यात सर्वदूर पाऊस कोसळत असल्याने प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. नदी काठावर किंवा धबधबा असलेल्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला देण्यात येतोय. पण तरीही काही नागरीक आणि तरुण मुलं हे पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी नदी, नाले प्रवाहीत झालेल्या ठिकाणी जातात. पण त्यामुळे अनपेक्षित दुर्घटना घडत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. तशीच एक अनपेक्षित घटना ही गोंदियाच्या तुमखेडा खुर्दे या गावात घडल्याची माहिती समोर आली आहे. नाल्याला आलेल्या पुरामुळे तीन जण वाहून गेले होते. या पैकी एकाला वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. पण दोन जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सध्या सुरु आहे. नेमकं काय घडलं? गोंदिया जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर गोंदिया तालुक्यातील तुमखेडा खुर्द गावात राहणारे तीन युवक हे लोधीटोला येथील नाल्याला आलेला पूर पाहण्यासाठी गेले असता मोठी दुर्घटना घडली. या तीनही तरुणांचा तोल गेल्याने ते युवक नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेले. संबंधित घटना घडताच प्रशासन सतर्क झालं. प्रशासनाने तातडीने बचाव कार्याला सुरुवात केली. तीन युवकांपैकी एका युवकाला वाचविण्यात आले असून तर दोघांचा शोध सुरू आहे. पुरात वाहून गेलेल्या युवकांचे नाव आशिष बागळे (वय 24 वर्ष) व संजू बागळे (वय 27 वर्ष) असे आहेत. हे दोघेही भाऊ आहेत. तर सागर परतेती (वय 28 वर्ष) याला वाचविण्यात आले आहे. (वसईत चाळीवर कोसळली दरड, आई-मुलगा वाचला, पण बाप-लेकीचा झाला मृत्यू) नांदेडमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या दोन तरुणांना बाहेर काढण्यात यश दुसरीकडे नांदेडमधून देखील अशीच काहिशी घटना समोर आली. पाण्याच्या प्रवाहातून दुचाकीवर जाण्याच्या प्रयत्नात वाहून जाणारे दोघे जण रात्रभर झाडाला अडकले होते. या दोघांची एसडीआरएफच्या पथकाने सुखरूप सुटका केली. नांदेड जिल्ह्यातील ही घटना आहे. नांदेड मुदखेड रोडवर इजळी जवळील सीता नदीला पूर आलाय. पुराचे पाणी पुलावरून वाहत आहे. या पाण्यातून दोघेजण आपल्या दुचाकीवरून जाण्याचा प्रयत्न करत होते. मुदखेड येथील दीपक शर्मा आणि बारड येथील सावळा शिंदे हे दोघे आपापल्या दुचाकीवरून जाण्याचा प्रयत्न करत होते. पण दोघेही दुचाकी सह वाहून गेले. सुदैवाने एका लिंबाच्या झाडाला दोघांनीही पकडले. मोबाईलवरून त्यांनी संपर्क साधला. एसडीआरएफची टीम आणि जिल्हाधिकारी इटनकर रात्रीच घटनास्थळी पोहोचली. पण रात्री त्यांना काढणे शक्य झाले नाही. सकाळी दोघांची सुखरूप सुटका करण्यात आली.
First published:

Tags: Maharashtra News, Rain

पुढील बातम्या