Home /News /maharashtra /

महाराष्ट्र शोकाकुल आहे, वाढदिवस साजरा न करण्याची मुख्यमंत्र्यांची सर्वांना विनंती, केले हे आवाहन

महाराष्ट्र शोकाकुल आहे, वाढदिवस साजरा न करण्याची मुख्यमंत्र्यांची सर्वांना विनंती, केले हे आवाहन

'राज्यावर आलेल्या अस्मानी संकट पाहता, वाढदिवसानिमित्त कुणीही अभीष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये तसंच फलक, पोस्टर्स लावू नये'

    मुंबई, 25 जुलै : 'कोकण, (kokan flood) पश्चिम महाराष्ट्रावर (kolhapur flood) निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये' असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery birthday) यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उद्या म्हणजे 27 जुलै रोजी वाढदिवस आहे. मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी उद्धव ठाकरे यांनी साधेपणानेच वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. 'राज्यावर आलेल्या अस्मानी संकट पाहता, वाढदिवसानिमित्त कुणीही अभीष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये तसंच फलक, पोस्टर्स लावू नये. कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये सोशल मीडिया व ई-मेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. श्रीमंतांच्या पार्टीवर पोलिसांची धाड, उडाली तरुणांची भंबेरी 'राज्यात अद्याप कोरोनाचे संकट कायम आहे,संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे, त्यामुळे आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळत राहणे गरजेचे आहे त्यामुळे वाढदिवसाचे कुठलेही जाहीर कार्यक्रम करू नये', अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 'पूर आणि कोरोना परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे, त्यामुळे वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपले योगदान देऊन सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पडावे, असं आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं. दरम्यान,   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पूरग्रस्तं चिपळूण  मधील बाजारपेठ, चिंचखरी नाका आणि अभिरुची हॉटेल येथे येऊन व्यापारी, स्थानिक नागरिक आणि छोटे छोटे व्यवसायिकांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरी जिल्हाधिकारी आणि आपतकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून महापुराच्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत देण्याचं जाहीर केलं आहे. Live in पार्टनरने केला घात; 48 दिवसांनंतर स्वीटी पटेलच्या हत्येचं गूढ उलगडलं उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वांची आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत. हवामान बदलाचा फटका बसला आहे. आपण वस्तूस्थिती स्वीकारली पाहिजे. संकटांचा धोका लक्षात घेता एनडीआरएफच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात एक टीम तयार केली जाणार आहे. कोकणात पूर व्यवस्थापन उभारणार आहोत. वारंवार संकटे येत आहेत हे लक्षात घेऊन या सर्व सबंधित जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येईल. राज्य आपत्ती निवारण दले म्हणजेच एसडीआरएफ आहेच पण ते अधिक सक्षम करु अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या