मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Maharashtra Weather Update : ऑक्टोबर हिटचा दणका सप्टेंबरमध्येच, परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण

Maharashtra Weather Update : ऑक्टोबर हिटचा दणका सप्टेंबरमध्येच, परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण

राज्यात परतीच्या पावसाचे पोषक हवामान झाल्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. (Maharashtra Weather Update)

राज्यात परतीच्या पावसाचे पोषक हवामान झाल्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. (Maharashtra Weather Update)

राज्यात परतीच्या पावसाचे पोषक हवामान झाल्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. (Maharashtra Weather Update)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 28 सप्टेंबर : मागच्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे परतीच्या पावसाची चाहूल लागली आहे. राज्यात परतीच्या पावसाचे पोषक हवामान झाल्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल(दि.27) राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या. आज (दि. 28) उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्याच्या विविध भागांत हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान मागच्या 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, सोलापूर, मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, परभणी, नांदेड जिल्ह्यांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील पातूर, पालघर जिल्ह्यांतील मोखेडा येथे सर्वाधिक 60 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

हे ही वाचा : Change in Rules: ऑक्टोबरपासून लागू होणार ‘हे’ 5 नवीन नियम, तुमच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम

राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, कोकण : मोखेडा 60, पालघर 30, मध्य महाराष्ट्र : कर्जत 50, जेऊर, करमाळा, हर्सल 40, नेवासा, इगतपुरी 30, जामखेड, देवळा, श्रीगोंदा, शिरूर, कळवण प्रत्येकी 20, ओझरखेडा, सटाना, खंडाळा, पारनेर, दौंड, चास, तासगाव, माढा, चांदवड, महाबळेश्वर प्रत्येकी 10. मराठवाडा : पातूर 60, वैजापूर, जिंतूर 50, धर्माबाद 40, जालना, परभणी, परांडा, भोकर, देगलूर, नांदेड प्रत्येकी 30, रेणापूर, कळंब, पूर्णा, वसमत, औंढा नागनाथ, अंबड, प्रत्येकी 20, अर्धापूर, आष्टी, मुदखेड, सेलू, लोहारा, भूम, मुखेड, शिरूर अनंतपाळ, औसा, निलंगा, खुलताबाद, किनवट प्रत्येकी 10. विदर्भ : सालकेसा, तुमसर, पोंबुर्णा, गोरेगाव, गोंदिया, देवरी प्रत्येकी 10.

मान्सून परतीसाठी पोषक हवामान

मान्सूनने वायव्य भारतातून परतीचा प्रवास सुरू केला असून, मागच्या आठवड्यात राजस्थानच्या खाजूवाला, बिकानेर, जोधपूर, आणि गुजरातच्या नालिया पर्यंतच्या भागातून मान्सून परतला आहे. त्यानंतर परतीच्या प्रवासात कोणतीही वाटचाल झालेली नसून, सोमवारी (ता. 26) मान्सूनच्या परतीची सीमा कायम होती. परतीसाठी पोषक हवामान झाल्याने येत्या दोन ते तीन दिवसांत वायव्य आणि मध्य भारताच्या काही भागातून मान्सून परत जाण्याची शक्यता आहे. विजांसह पावसाचा येलो अलर्ट धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली या भागात देण्यात आला आहे.

यंदाच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका

राज्यात जून महिन्यात पावसानं उघडीप दिली होती. मात्र, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसानं राज्यात धुमाकूळ घातला होता. तसेच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला देखील राज्यात चांगल्या पावसानं हजेरी लावली होती. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. काही ठिकाणी तर अतवृष्टी झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

हे ही वाचा : Video : सौंदर्याचा खजिना 'कास पठार' फुलले, निसर्ग वाचवण्यासाठी पहिल्यांदाच खास उपाय

शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे, शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या आहेत. तसेच या पावसामुळं धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. राज्यातील 24 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 60 टक्के अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 1 जूनपासून राज्यात सर्वच जिल्ह्यात पावसाचं प्रमाण समाधानकारक आहे.

First published:

Tags: Mumbai rain, Rain fall, Rain updates, Weather forecast, Weather update