मुंबई, 01 सप्टेंबर : मागच्या 48 तासांपासून राज्यात उन पावसाचा खेळ सुरू आहे. दरम्यान दोन दिवसांच्याच पावसानंतर राज्यात उकाड्यात चांगलीच वाढ झाल्यानंतर पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. (Maharashtra Rain News) अनेक भागांत विजांसह पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता.1) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजा, मेघगर्जना वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याची शक्यता कायम आहे.
राज्यात अनेक ठिकाणी विजा मेघगर्जनेसह वळीव स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा येथे अतिवृष्टी होऊन तिथे 130 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज (ता.1) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उलाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
आज संध्याकाळी गणपती विसर्जन: कृपया IMD अपडेट्स पाहा,विशेषत: दुपार नंतर, IMD द्वारे पुढील 3,4 तासांसाठी जारी करण्यात येणारे इशारे IMD GFS मॉडेल मार्गदर्शन महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात,मराठवाडा,कोकणातील काही भाग, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दर्शवते.मुंबई ढगाळ घाट भागात अधिक शक्यता pic.twitter.com/lGxUDv0qdF
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 1, 2022
हे ही वाचा : आंघोळीसाठी थांबणे जीवावर बेतले, मित्राला वाचवताना दुसरा मित्रही गेला वाहून
दरम्यान राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर. औरंगाबाद, उस्मानाबाद, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.
दरम्यान मागच्या दोन दिवसांपासून राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने हजारो हेक्टर जमीनीतील शेतील फटका बसला आहे.
हे ही वाचा : मुलं-बायकांनी भरलेली बोट उलटली, दुर्घटनेचा थरारक LIVE व्हिडीओ आला समोर
राज्यात मागच्या 24 तासात चिपळूण ४०, खेड ३० गुहागर २०,वाकवली २०.पाडेगाव ५०, पाट ४०, माशिवा 30, साक्री ३०, आक्रणी, जावळीमेदा चाळीसगाव, शेवगाव प्रत्येकी 20, देवळा, कागल, सासवड, बारामती प्रत्येकी 10. मराठवाड्यातील लोहारा 130 सोयगाव, तुळजापूर, पालम प्रत्येकी 10. बुलढाणा 30, चिखलदरा, अंजनगाव 20, कोरपना, वनी, भद्रावती प्रत्येकी 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली दरम्यान झालेल्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Monsoon, Mumbai rain, Rain in kolhapur, Weather, Weather forecast, Weather warnings