मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Maharashtra Rain : दिवसभर उन्हाच्या झळा तर संध्याकाळी विजांसह पाऊस imd कडून या जिल्ह्यात अलर्ट

Maharashtra Rain : दिवसभर उन्हाच्या झळा तर संध्याकाळी विजांसह पाऊस imd कडून या जिल्ह्यात अलर्ट

राज्यात मागच्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने उन्हाच्या झळा आणि उकाड्यात चांगलीच वाढ झाली. (Maharashtra Rain)

राज्यात मागच्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने उन्हाच्या झळा आणि उकाड्यात चांगलीच वाढ झाली. (Maharashtra Rain)

राज्यात मागच्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने उन्हाच्या झळा आणि उकाड्यात चांगलीच वाढ झाली. (Maharashtra Rain)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 31 ऑगस्ट : राज्यात मागच्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने उन्हाच्या झळा आणि उकाड्यात चांगलीच वाढ झाली. यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने अनेक भागात विजांसह वादळी पावसाने पुनरागमन केले आहे. (Maharashtra Rain) काल (दि.30) कोल्हापूर, सांगलीसह कोकणात जोरदार पावसाने हजेरी लावली काल झालेल्या पावसाने पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. दरम्यान आज (ता. 31) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पावसाला पोषक हवामान झाल्याने विदर्भात अनेक ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. 31) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे.

हे ही वाचा : Ganesh Chaturthi 2022: पुणेकरांनो आज घराबाहेर पडण्यापूर्वी 'ही' बातमी वाचा, वाहतुकीमध्ये आहेत मोठे बदल

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग मध्य महाराष्ट्र जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर. मराठवाडा औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड. विदर्भ : अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तर मागच्या 24 तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस कोकण कुडाळ, सावंतवाडी प्रत्येकी 10. मध्य महाराष्ट्र कवठे महांकाळ, मालेगाव प्रत्येकी 30.

मराठवाडा उमरगा 40, धर्माबाद धनसांगवी फुलंनी प्रत्येकी 20 खैरगाव, पाथरी, अर्धापूर प्रत्येकी 10. विदर्भ: सावळी, मूल प्रत्येकी 50, आरमोरी, धानोरा प्रत्येकी 40. एटापल्ली, गडचिरोली घाटंजी, राळेगाव, साला आण, सडक अर्जुनी, कोच प्रत्येकी 30.

हे ही वाचा : Ganesh Chaturthi Wishes: यंदा उत्साहात करा बाप्पाचं स्वागत, व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवा 'हे' सुंदर शुभेच्छापर संदेश

हवामान खात्याच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात विशेषतः दुपारी किंवा संध्याकाळी उच्च तापमानामुळे वादळी वारे, विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचबरोबर पुढच्या 48 तासांत तापमानात वाढ होऊन पावसाची शक्यता आहे. तापमानात वाढ झाल्याने 30 आणि 31 ऑगस्ट रोजी जोरदार वारे, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

पुण्यात पुढच्या दोन दिवसांत साधारणपणे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर वाढेल असे पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

First published:

Tags: Mumbai rain, Rain in kolhapur, Weather forecast, Weather update