LIVE : राज्यात कोरोना रुग्णाच्या आकडेवारीत घट, पण 224 जणांचा मृत्यू

पावसामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार उडाला आहे. पाहा पाऊस, कोरोना आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | July 24, 2021, 20:47 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  20:37 (IST)

  राज्यात दिवसभरात 7,332 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 6,269 रुग्णांची नोंद
  राज्यात दिवसभरात 224 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात सध्या 93 हजार 479 अॅक्टिव्ह रुग्ण
  राज्याचा रिकव्हरी रेट 96.35, मृत्युदर 2.1% 

  20:30 (IST)

  अशोक चव्हाणांचं सर्वपक्षीय खासदारांना आवाहन
  'आरक्षणाची 50 टक्के मर्यादा शिथिलची मागणी करा'
  'संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पाठपुरावा करावा'
  'मराठा आरक्षणासाठी योगदान आणि सहकार्य द्या'
  अशोक चव्हाणांचं सर्वपक्षीय खासदारांना आवाहन 

  17:57 (IST)

  'दरडग्रस्त तळीये गावाचा पुनर्विकास म्हाडा करणार'
  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मोठी घोषणा
  'तळीये गाव वसवण्याची जबाबदारी आता म्हाडाकडे'
  ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती - आव्हाड 

  16:30 (IST)

  'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या चिपळूणमध्ये'
  'मुख्यमंत्री पूरग्रस्त भागाचा दौरा करणार'
  मंत्री उदय सामंत यांची माहिती  

  16:30 (IST)

  'न्यूज18 लोकमत' दुर्घटनाग्रस्त तळीये गावात
  महाड - तळीये गावात दरड कोसळून दुर्घटना
  तळीयेत दरड कोसळल्यानं 35 घरं जमीनदोस्त
  तळीयेत आतापर्यंत 44 जणांचे मृतदेह सापडले
  तळीये गावात मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश

  मुख्यमंत्र्यांची दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला भेट
  उद्धव ठाकरेंनी तळीये गावाची केली पाहणी
  पावसाचं परिमाण कुणी ठरवू शकत नाही - सीएम
  'तळीये ग्रामस्थांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन करणार'
  धोकादायक वस्त्यांचं पुनर्वसन करणार - मुख्यमंत्री
  'तळीयेतील गावकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये'
  'स्वत:ला सावरा, बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा'
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा तळीये दुर्घटनाग्रस्तांना धीर
  राज्य सरकार संपूर्ण नुकसान भरपाई देणार - सीएम
  'अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेणार'
  'पाण्याच्या नियोजनासाठी आराखडा तयार करणार' 

  14:17 (IST)

  कोल्हापूर, सांगलीत पूरस्थिती - फडणवीस
  'सरकारनं तातडीनं पाऊल टाकण्याची गरज'
  'अलमट्टी विसर्गाबाबत कर्नाटकशी समन्वय हवा'
  'अधिकच्या विसर्गासाठी आताच प्रयत्न करावा'
  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

  13:41 (IST)

  कोल्हापूर - जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर
  पूरस्थिती मदतीसाठी लष्कराला पाचारण
  65 जवानांचे युनिट कोल्हापुरात दाखल
  शिरोळ तालुक्यात लष्कराची टीम पोहचली

  13:19 (IST)

  राज्यातील 9 जिल्हे अतिवृष्टीनं बाधित - अजित पवार
  'अनेक ठिकाणी कोसळलेल्या दरडी हटवण्याचं काम'
  'पुणे जिल्ह्यात 30 गावं दरडप्रवण क्षेत्रात मोडतात'
  रायगडच्या तळीयेमध्ये असं नव्हतं - अजित पवार
  'तळीये दुर्घटनास्थळी पोहोचणं सुरवातीला कठीण होतं'
  रायगडमधील परिस्थिती आता सुधारतेय - अजित पवार
  'एनडीआरएफची 31 तर वायुदलाची 14 पथकं कार्यरत'
  पूरग्रस्तांना हेलिकॉप्टरद्वारे अन्न वाटप - अजित पवार
  पालकमंत्र्यांना जिल्ह्यात थांबण्याच्या सूचना - अजित पवार

  12:51 (IST)

  मुंबई - पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरण
  राज कुंद्रा विरोधात ईडी करणार कारवाई
  ईडी कोणत्याही क्षणी FIR दाखल करणार
  कोट्यवधींची उलाढाल झाल्याचा ईडीला संशय
  ईडी 'फेमा' अंतर्गत तपास करण्याची शक्यता

  12:47 (IST)

  'ही नैसर्गिक आपत्ती, ही राजकारणाची वेळ नाही'
  12 तासांमध्ये 700 मिमी पाऊस - नाना पटोले
  मदत पोहोचवणे, मृतदेह शोधणे गरजेचं - पटोले

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स