liveLIVE NOW

LIVE : दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत

पावसामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार उडाला आहे. पाहा पाऊस, कोरोना आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | July 23, 2021, 18:37 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  21:35 (IST)

  रायगड - पोलादपूर तालुक्यातील दुर्घटना
  साखर सुतारवाडी, केवनाळे गावात भूस्खलन
  दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू तर 28 जण जखमी
  स्थानिकांच्या मदतीनं 10 मृतदेहांना बाहेर काढलं
  साखर सुतारवाडीतील एक मुलगी अजूनही बेपत्ता

  21:24 (IST)

  कल्याण - वाहून गेलेल्या 2 तरुणांचे मृतदेह हाती
  गुरुवारी दुपारी 4 वाजता 2 तरुण गेले होते वाहून
  मलंगगड चिंचवली नदीत पोहण्यासाठी उतरले होते

  21:24 (IST)

  ओढ्यात 2 मुलं वाहून गेली, शोधकार्य सुरू
  जोरदार पावसात 6 मुलं गेली होती पोहायला
  भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा इथली घटना

  19:51 (IST)

  NDRFच्या आणखी 8 तुकड्या रवाना
  भुवनेश्वरहून महाराष्ट्रासाठी NDRF रवाना
  कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरीत 18 टीम
  पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं कुमक मागवली
  अनेक गावांमध्ये उशिरा पथकं पोहोचली
  युद्धपातळीवर बचावकार्य आणि मदतकार्य सुरू
  NDRF, SDRF, नेव्ही, आर्मी, एअरफोर्स तैनात
  महाराष्ट्रावर एका मागोमाग एक अनेक संकटं

  19:1 (IST)

  महाड, माणगाव, पोलादपूर, कोलाडमध्ये मुसळधार
  सावित्री, कुंडलिका आंबा धोक्याच्या पातळीवर
  ओसरत चाललेलं पुराचं पाणी पुन्हा भरणं सुरू
  या जोरदार पावसामुळे रेस्क्यू टीमला अडथळे

  18:54 (IST)

  बीड-उस्मानाबाद रस्त्यावर 4 तरुण ठार
  टेम्पोचं पंक्चर चाक बदलवत होते तरुण
  भरधाव येणाऱ्या ट्रकनं तरुणांना उडवलं
  अपघातात चौघांचा जागीच मृत्यू तर 5 जखमी
  जखमींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू

  18:47 (IST)

  आपत्तीकाळात असं निद्रिस्त सरकार महाराष्ट्रानं कधी पाहिलं नाही, तळीये इथं दुर्घटना घडल्यानंतर 20 ते 22 तास प्रशासनाचा कोणताही अधिकारी दुर्घटनास्थळी न पोहोचणं दुर्दैवी, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी व्यक्त केली खंत

  18:46 (IST)

  नवी मुंबईत 15 दिवसांत 1 लाख कोरोना टेस्ट
  एक रुग्ण सापडल्यास इमारतीतील सर्वांची टेस्ट
  टार्गेटेड टेस्टिंगवर नवी मुंबई महापालिकेचा भर
  नवी मुंबईकरांचाही या मोहिमेला चांगला प्रतिसाद
  नवी मुंबई शहरातील रुग्णसंख्या सरासरी 60 वर

  18:44 (IST)

  रायगड - महाडमध्ये सर्वात मोठी दुर्घटना
  तळीये मधलीवाडीत 35 घरांवर कोसळली दरड
  तळीये गावात दरड कोसळून 49 जणांचा मृत्यू
  'आपत्तीकाळात निद्रिस्त सरकार कधी पाहिलं नाही'
  वि.प. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची टीका
  'दुर्घटनेनंतर 20-22 तास दुर्घटनास्थळी कोणी नाही'
  'प्रशासनाचा कोणताही अधिकारी न पोहोचणं दुर्दैवी'
  विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी व्यक्त केली खंत

  18:29 (IST)

  राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी जाणार कोकणात

  अन्न आणि औषधी मदत घेऊन जाणार कोकणात

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स