• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE : ममतादीदींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

LIVE : ममतादीदींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

पावसामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार उडाला आहे. पाहा पाऊस, कोरोना आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | July 27, 2021, 17:41 IST
  LAST UPDATED 10 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  20:41 (IST)

  'चिपळूण शहराच्या स्वच्छतेसाठी 2 कोटींचा निधी'
  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
  वि.प. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांकडून आभार
  'महाडच्या स्वच्छतेसाठी जाहीर 50 लाख मदत तोकडी'
  आणखी वाढीव 50 लाख रुपये द्यावेत - प्रवीण दरेकर
  दरेकरांची नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी
  मंत्र्यांनी वाढीव 50 लाख रुपये देण्याचं दिलं आश्वासन

  20:36 (IST)

  बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री
  केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती

  20:26 (IST)

  वन्यप्राण्यांना दत्तक घ्या, वन्यजीव संवर्धनाला मदत करा; संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची योजना

  19:48 (IST)

  गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीतील पीक नुकसानीसाठी 701 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल कृषिमंत्र्यांनी मानले केंद्र शासनाचे आभार, सध्याच्या नैसर्गिक आपत्तीतही केंद्रानं तातडीनं मदत करावी - कृषिमंत्री दादाजी भुसे

  19:45 (IST)

  वि.प. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उद्या साताऱ्यात
  दरेकर सातारा जिल्ह्यातील नुकसानीचा घेणार आढावा

  19:33 (IST)

  नाशिक - गंगापूर धरणात 68 टक्के पाणीसाठा
  तरीही बुधवारी पाणीकपात होणार - महापालिका
  नाशिक जिल्ह्यातील इतर धरणांमध्ये साठा कमी

  19:26 (IST)

  'चिपळूण शहराच्या स्वच्छतेसाठी 2 कोटींचा निधी'
  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
  चिपळूणला पुन्हा उभं करणार - एकनाथ शिंदे
  5 मुख्याधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती
  'ठाणे, नवी मुंबईतील स्वच्छता कर्मचारीही मदतीला देणार'
  पूरग्रस्त लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचं वाटप
  चिपळूण शहर, बाजारपेठेची नगरविकासमंत्र्यांकडून पाहणी

  18:51 (IST)

  'नागपुरातील कोरोनाचं प्रमाण लक्षणीयरीत्या कमी'
  'छोटे व्यवसायी, दुकानदारांची हलाखीची स्थिती'
  'नागपुरात निर्बंधांमध्ये तातडीनं शिथिलता द्या'
  देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

  17:46 (IST)

  खेडमधील पोसरे बौद्धवाडीत रेस्क्यू ऑपरेशन संपलं
  तब्बल 96 तास NDRF आणि सैन्यदलाचं बचावकार्य
  17 पैकी 16 जणांचे मृतदेह काढले बाहेर, 1 मृत घोषित
  दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे NDRF तळ ठोकून
  उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोनेंची माहिती

  17:15 (IST)

  बारावीचा निकाल 30 जुलैला लागण्याची शक्यता?
  सुप्रीम कोर्टाकडून 31 जुलैपर्यंत निकालाचे आदेश

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स