मुंबई, 18 ऑक्टोबर : मागच्या काही दिवसांपासून परतीचा पाऊस हाहाकार घालत आहे. काल झालेल्या पावसाने मुंबई, पुणे, कोल्हापूर, मराठवाड्यासह पार दैना उडाली होती. दरम्यान हवामान खात्याकडून दिलासादायक बातमी मिळाली आहे. राज्यात मान्सून, माघारीसाठी अनकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भ, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशाचा काही भाग आणि संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये मान्सून परतीस पोषक वातावरण निर्माण झाले असून, पुढच्या 24 तासांत मान्सून माघारी परतणार असल्याची दाट शक्यता हवामान खात्याने दिली आहे.
राज्यात यापूर्वी मान्सून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात जातो परंतु यंदा हवामान बदलामुळे मान्सून बरसत आहे. अखेर मान्सूनने माघारी जाण्याची तयारी केली आहे. पण मध्य महाराष्ट्र, कोकण-गोव्यात 19 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पण पुढील काही दिवस अजून काही भागात पाऊस पडणार आहे. तसेच या आठवड्यात मुंबई, पुणे, ठाणे, सातारा, नाशिक, औरंगाबाद, बीड आणि सोलापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
Monsoon to leave #Maharashtra in style: Heavy rains have been forecast across Madhya Maharashtra, Konkan-Goa till Oct 19. Mumbai, Pune, Thane, Satara, Nashik, Aurangabad, Beed & Solapur districts are on yellow watch this week. #MumbaiRains Read: https://t.co/bwYo7YVqwb pic.twitter.com/7ljz7xX0Xj
— The Weather Channel India (@weatherindia) October 17, 2022
हे ही वाचा : मध्यरात्रीपर्यंत सुरू होतं पावसाचं थैमान, गाड्या पाण्यात वाहत होत्या, पुण्याचे 5 धक्कादायक VIDEO
गेल्या काही वर्षातील अंदाजानुसार, 10 ऑक्टोबर पूर्वीच मान्सून माघार घेतो. पण यावर्षी मात्र मान्सूनने आपला मुक्काम लांबवला आहे. १८ ऑक्टोबरपर्यंत तरी मान्सून परतलेला नाही, पण येत्या दोन दिवसात मान्सून परतणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे.
मान्सून परतीचा ‘या’ जिल्ह्यांना तडाखा
मान्सून परतीच्या पावसाने देशातीस अनेक राज्यांसह महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, बीड आणि सोलापूर जिल्ह्यांना चांगलेल झोडपले आहे. गेल्या आठवड्यांपासून या भाागत मुसळधार पाऊस पडत आहे.
हे ही वाचा : पुराच्या पाण्यात कार बुडाली? कसा करायचा इंश्युरन्सचा क्लेम; वाचा संपूर्ण प्रक्रिया
पुण्यात पावसाचा हाहाकार
राज्यात सध्या सर्वत्र परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय आणि या परतीच्या पावसाचा फटका पुणे शहरालादेखील बसला. सोमवारी रात्री नारायण पेठ, सदाशिव पेठ, स्वारगेट, नवी पेठ यासह कात्रज, कोंढवा, कर्वेनगर या उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. बिबवेवाडी परिसरात तर ढगफुटी सारखा पाऊस झाला. पुण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांच स्वरुप आल्याचं पाहायला मिळालं. दगडूशेठ मंदिरात देखील पाणी शिरलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai rain, Pune rain, Rain in kolhapur, Weather update, Weather warnings