मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Maharashtra Rain Alert : राज्यातील ‘या’ जिल्ह्यामधील पावसाच्या अलर्टच्या तारखा जाणून घ्या अन् करा विकेंड प्लॅन

Maharashtra Rain Alert : राज्यातील ‘या’ जिल्ह्यामधील पावसाच्या अलर्टच्या तारखा जाणून घ्या अन् करा विकेंड प्लॅन

राज्यात मागच्या चार दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा कमी झाल्याने राज्यातील पावसाचे प्रमाण थोडे कमी झाले आहे. (Maharashtra Rain Alert)

  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 13 ऑगस्ट : राज्यात मागच्या चार दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा कमी झाल्याने राज्यातील पावसाचे प्रमाण थोडे कमी झाले आहे. (Maharashtra Rain Alert) पुढच्या काही दिवसांत पावसाचा जोर थोडा ओसरलेला दिसणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीसह सावंतवाडी, दोडामार्ग तालुके मात्र कोकणातील आजच्या उघडिपीला अपवाद ठरले. या दोन्ही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. येणाऱ्या दहा-बारा दिवसांत राज्यातील बहुतांश भागांतून पावसाची मोठी उघडीप राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

विदर्भात अकोला जिल्ह्यात शुक्रवारी पावसाचा जोर ओसरला होता. अकोला, अकोट, बाळापूर बार्शीटाकळी, मुर्तिजापूर भागात हलका पाऊस झाला. अमरावती, भंडारा जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी होता. भंडारा जिल्ह्यातही पाऊस कमी झाला. बुलडाणा जिल्ह्यातही पाऊस उघडला होता. चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही पावासाचा जोर ओसरला.

हे ही वाचा : VIDEO:..अन् शेवटी ब्लँकेटची झोळी करून गरोदर महिलेला रुग्णालयात नेलं; नाशिकमधील मनाला चटका लावणारं दृश्य

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी भागात १५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. चंदगड, आजरा, गगनबावडा, शाहुवाडी आणि पन्हाळा तालुक्यांतही जोरदार पाऊस झाला. धरणक्षेत्रात पावसाच जोर अधिक होता. कोल्हापूर शहरात मात्र पावसाने उघडीप दिली होती. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे १९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

तर अन्य भागांत हलक्या सरी पडल्या. पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे १६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावरही पावसाचा जोर अधिक होता. इतर ठिकाणी मात्र तुरळक पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे ११० मि.मी. पावसाची नोंद झाली. त्र्यंबकेश्वर, हर्सल, ओझरखेडा, सुरगणा भागात पावसाचा जोर अधिक होता.

हे ही वाचा : भंडाऱ्यात अतिवृष्टीचा कहर, 2 हजार कोंबड्या गेल्या पुरात वाहून!

हवामान विभागाने सातारा आणि पुणे जिल्ह्यात शनिवारसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. संपूर्ण विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. २५ ऑगस्टनंतरच मोठ्या पावसाला सुरूवात होईल तसेच सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल. असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात आणि सप्टेंबरमधील परतीच्या पावसाचे प्रमाण राज्यात सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे.

जिल्हानिहाय यलो अलर्टच्या तारखा

रायगड १५ ऑगस्ट, रत्नागिरी १४, १५, पुणे १३ ते १५, कोल्हापूर १४, १५, सातारा १३ ते १५, हिंगोली १९, नांदेड १९, अकोला १३ ते १५, अमरावती १४, १५, भंडारा १३, बुलडाणा १३, चंद्रपूर १३, १४, गडचिरोली १३ ते १६, गोंदिया १३ ते १५, नागपूर १३ ते १५, वर्धा १३, वाशिम १३, १४, यवतमाळ १३, १४.

First published:

Tags: Mumbai rain, Rain fall, Rain flood, Weather forecast

पुढील बातम्या