मुंबई, 21 ऑगस्ट : राज्यातील पश्चिम महाराष्ट्रासह, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. (Maharashtra Pune Kolhapur Rain) दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याची तिव्रता कमी झाला आहे. याचबरोबर दक्षिण झारखंड आणि उत्तर ओडिशा परिसरावर असलेली ही प्रणाली वायव्येकडे सरकत आहे. आजपासून बंगालच्या उपसागरातील तिव्रता कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान पुणे, रायगड, कोल्हापूर या महत्वाच्या जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातील वादळी स्थितीमुळे विदर्भात ढग साचण्यास सुरूवात झाली आहे. आज (ता. 21) विदर्भातील अनेक जिल्हे, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मान्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्चिमेकडील टोक हिमालय पर्वताच्या पायथ्याकडे सरकले असून, पूर्वेकडील टोक बहारीच, वाराणसी, तीव्र कमी दाब क्षेत्राचे केंद्र आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे.
हे ही वाचा : नदीचा तीव्र प्रवाह अन् डोळ्यांदेखत रेल्वेचा 800 मीटर पूल कोसळला; धक्कादायक Video
विदर्भासह, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरूच असून, कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, या जिल्ह्यांना देण्यात आला आहे. तर अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत विजांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बुलढाणा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मागच्या 24 तासांत जोरदार पावसाने हजेरी लावली होती.
हे ही वाचा : शिवसेना-भाजप आमनेसामने, शिर्डीतून दहशतवादी ताब्यात, हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार TOP बातम्या
मागच्या 24 तासांत कोकण तळा, लांजा, वैभववाडी प्रत्येकी 50, माणगाव, राजापूर, माथेरान, पोलादपूर, मुरूड प्रत्येकी 40, महाड, खेड, अंबरनाथ, चिपळूण, दापोली, म्हसळा, उल्हासनगर, ठाणे प्रत्येकी 30, महाबळेश्वर 50, गगनबावडा, लोणावळा प्रत्येकी 40, इगतपुरी, पौड़ प्रत्येकी 30. घाटमाथा अंबोणे 150, दावडी 140, ताम्हिणी 120, कोयना पोफळी 110, शिरगाव 90, डुंगुरवाडी 60, कोयना नवजा 50 असा पाऊस झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune rain, Rain fall, Rain flood, Rain in kolhapur