पुणे, 16 जानेवारी : आज देशभरात कोरोना लसीकरण अभियानाला सुरुवात झाली आहे. आज 28 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना वॅक्सिनचा पहिला डोस देण्यात येणार आहे. दरम्यान, दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील पहिलं कोरोना व्हायरस संक्रमित कुटुंबाने सामन्य लोकांना ज्यावेळी कोरोना लस देण्यात येईल, त्यावेळी आम्ही आमच्या पैशांनी लस खरेदी करून ती घेणार असल्याचं सांगितलं आहे. महाराष्ट्रातील हे पहिलं कोविड-19 संक्रमित कुटुंब पूर्णपणे कोरोना व्हायरस मुक्त झालं आहे. भारतात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला असून, आपली प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रातील 285 सेंटर्सवर वॅक्सिनेशनची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. दरम्यान, 5 मार्च रोजी दुबईहून आलेलं पुण्यातील हे कुटुंब, कोरोनाची लक्षण दिल्यानंतर 9 मार्च रोजी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं समजलं. कुटुंबातील चारपैकी तीन जणांना लागण झाली. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाला क्वारंटाईन करून पुण्याच्या डॉ. नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 17 दिवसांनंतर हे कुटुंब कोरोनामुक्त झालं.
पुण्यातील हे कुटुंब 40 लोकांच्या एका ग्रुपसोबत दुबईला गेलं होतं. दुबईहून आल्यानंतर त्यांना हलका ताप आणि खोकला जाणवला. त्यावेळी डॉक्टरकडे गेल्यानंतर, डॉक्टरांनी त्यांचे सॅम्पल घेतले. रिपोर्ट येईपर्यंत 8 तास त्यांना रुग्णालयाच्या एका खोलीत ठेवण्यात आलं होतं. रात्री रिपोर्ट आल्यानंतर, चारपैकी तीन जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं, असं कुटुंब प्रमुखांनी सांगितलं.
रिपोर्टनंतर आल्यानंतर, त्यांना रुग्णालयात दाखल करणार आलं. 14 दिवसांनंतर त्यांची पुन्हा दुसरी कोरोना टेस्ट करण्यात आली आणि त्या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. रुग्णालयातून घरी आल्यानंतर 14 दिवस घरी संपूर्ण कुटुंब क्वारंटाईन असल्याचं त्यांनी सांगितलं.
लसीकरणाची आजपासून सुरुवात झाल्याचा आनंद आहे. परंतु आमचं कुटुंब आता लसीकरण करणार नाही. ज्यावेळी सर्वसामान्यांना लस दिली जाईल, त्यावेळी आमच्या पैशाने लस खरेदी करून घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.