मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस बैठकीत पटोलेंना 'ना-ना'? महत्त्वाच्या नेत्यांनी दांडी मारल्याने भुवया उंचावल्या

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस बैठकीत पटोलेंना 'ना-ना'? महत्त्वाच्या नेत्यांनी दांडी मारल्याने भुवया उंचावल्या

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीला अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी दांडी मारल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीला अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी दांडी मारल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीला अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी दांडी मारल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 19 सप्टेंबर : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने बैठक आयोजित केली होती. मात्र, पक्षातील ज्येष्ठ नेते आणि अनेक आमदार या बैठकीला गैरहजर असल्याने काँग्रेस वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच बैठकी मंजूर झालेले ठराव देखील पटोले यांनी सांगितले.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने महत्त्वाची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी दांडी मारल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसच्या आजच्या बैठकीला सुशील कुमार शिंदे, प्रणिती शिंदे,अमित देशमुख, धीरज देशमुख, वर्षा गायकवाड, नितीन राऊत, सतेज पाटील, के. सी, पाडवी, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे, विक्रम सावंत, रणजित कांबळे अनुपस्थित होते. यावर विचारले असता नागपूरहुन येणारे विमान रद्द झाल्याने अनेक नेते येऊ शकले नाही. तर अमित देशमुख परदेशात आहेत. संग्राम थोपटे यांची प्रकृती ठीक आहे. सुशील कुमार शिंदे बाहेर आहेत, त्यामुळे हे लोक गैरहजर असल्याचं पटोले यांनी सांगितले?

वाचा - Maha Gram Panchayat election 2022 : 'बारामती' जिंकायला निघालेल्या भाजपला जोरदार धक्का, पवारांच्या गडाला सुरूंग नाहीच!

आजच्या बैठकीत दोन ठराव मंजूर

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीत दोन महत्त्वाचे ठराव मंजूर केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. एक राहुल गांधी यांनी राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे. आणि दुसरा प्रदेश अध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारिणी निवडण्याचा अधिकार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना देण्यात यावा.

हे लोकशाहीसाठी घातक : पटोले

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत नाही. त्यामुळे राज्यातील सर्वच पक्ष आपणच पुढे असल्याचा दावा करत आहे. राज्यात सगळीकडे आम्हीच आहोत अशीच पाठ थोपटत आहे, हे लोकशाही घातक आहे.

First published:

Tags: Nana Patole, अशोक चव्हाणCongress