Home /News /maharashtra /

ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, 100 युनिट वीज माफीचा शब्द पाळणार; पण...

ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, 100 युनिट वीज माफीचा शब्द पाळणार; पण...

मागील भाजप सरकारनं केलेल्या थकबाकीच्या पापाचं काय?

    मुंबई, 20 नोव्हेंबर: लॉकडाऊनमध्ये आलेल्या वाढीव वीज बिलातून 100 युनिटपर्यंत वीज माफ करणार, असा मी शब्द दिला होता. राज्यातील जनतेला 100 युनिट वीज माफी देण्याच्या घोषणेवर मी अजूनही ठाम आहे. मागील भाजप सरकारनं केलेल्या थकबाकीच्या पापाचं काय? असा सवाल देखील ऊर्जामंत्र्यांनी उपस्थित केला. वीज बिल माफ करण्यासाठी समिती देखील गठीत केली. पण कोरोना काळात बैठका होऊ शकले नाही, असं राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी स्पष्ट केलं. हेही वाचा...कुटुंबासोबत किल्ल्यावर भ्रमंतीसाठी आलेली महिला कोसळली खोल दरीत, अन्.. नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत संबोधित करताना सांगितलं की, 100 युनिट वीज माफ यासाठी भूमिका आज बदललेली नाही. भाजप नेत्यांनी वाढीव वीजबिल घेऊन माझ्या कार्यालयात यावे, मी चर्चा करायला तयार आहे, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. पण मागच्या सरकारनं जे पाप करून ठेवलं आहे. त्याचं आधी निरसन करून नंतरच 100 युनिट वीज माफी देण्याचा निर्णय घेण्यात येईल. असं काम सुरू आहे, असं राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट सांगितलं. भाजपवर जोरदार हल्लाबोल... वीज कंपन्यांच्या आर्थिक स्थितीची माहिती पत्रकारांना देतानाच नितीन राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. महावितरण कंपनीची मार्च 2014ची अखेरची थकबाकी 14 हजार 154 कोटी होती. ही थकबाकी आता 59 हजार 14 कोटी इतकी आहे. माजी ऊर्जामंत्र्यांनी चांगलं काम केलं, असा भाजपकडून दावा केला जात आहे. पण आकडेवारी मात्र वेगळेच सांगत आहे, असा टोला नितीन राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. दरम्यान, याच मुद्द्यावर काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, असं नितीन राऊत यांनी सांगितलं. अभ्यासगटाची समिती स्थापन 100 युनिट वीज माफी करावी, या घोषणेवर आपण आजही ठाम आहोत. मात्र, त्यासाठी अभ्यासगटाची समिती स्थापन करण्यात आली. मधल्या काळात कोरोना आल्याने या अभ्यासगटाच्या बैठका झाल्या नाहीत. त्यामुळे समितीचा अहवाल आला नाही. आताची महावितरणची आर्थिक स्थिती पाहता 59 हजार कोटींची तफावत आली आहे. मागच्या सरकारनं थकबाकीच पाप करून ठेवलं आहे. त्याचं निरसन करूनच 100 युनिट वीज माफीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं. हेही वाचा..सुशांतसिंगच्या आत्महत्येचं भांडवल करुन YouTuberनं कमावले चक्क 15 लाख रुपये केंद्र सरकारविरोधात आंदोलन करा, चंद्रकांतदादांना टोला... वाढीव बीजबिलाच्या मुद्द्यावरून भाजप आता आक्रमक झाली आहे. भाजपनं आंदोलन सुरू केलं असून मंत्रालयावरही मोर्चा आणण्याचा इशारा भाजपने दिला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना नितीन राऊत म्हणाले, भाजपने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले तर आनंदच होईल. कारण मी केंद्राला वारंवार पत्र लिहून ऊर्जा विभागाकडे 10 हजार कोटींच्या अनुदानाची मागणी केली. मात्र, केंद्राने त्यावर अद्यापही निर्णय घेतला नाही. त्यामुळे भाजपने केंद्राविरोधात आंदोलन करावं, असा टोला राऊत यांनी लगावला.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या