Home /News /maharashtra /

महाराष्ट्रातल्या सत्तानाट्यानंतर पडलं 'महाविकासआघाडी' सरकार, पण राहुल आणि प्रियांका गांधी गप्प का?

महाराष्ट्रातल्या सत्तानाट्यानंतर पडलं 'महाविकासआघाडी' सरकार, पण राहुल आणि प्रियांका गांधी गप्प का?

मागच्या एक महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये (Maharashtra Politics) मोठा उलटफेर झाला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde Shivsena) यांनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातलं महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळलं. पण राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

पुढे वाचा ...
    मुंबई, 4 जुलै : मागच्या एक महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये (Maharashtra Politics) मोठा उलटफेर झाला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde Shivsena) यांनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातलं महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे विधानपरिषद निवडणुकांनंतर शिवसेनेचे 39 आणि 11 अपक्ष अशा एकूण 50 आमदारांना घेऊन पहिले सूरत, मग गुवाहाटी आणि त्यानंतर गोव्याला गेले. खरंतर महाराष्ट्रातल्या या सत्तानाट्याची स्क्रीप्टला 10 जूनला सुरूवात झाली. राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. यानंतर 20 जुलैला या नाट्याचा दुसरा अंक समोर आला. जेव्हा विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन मुंबईतून बाहेर गेले. यानंतर 29 जूनला उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 30 जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राहुल-प्रियांका गप्प का? महाराष्ट्रात मागच्या 25 दिवसांमध्ये झालेल्या राजकीय भुकंपाबाबत राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही काँग्रेसचे हे दोन्ही सर्वोच्च नेते बोलले नाहीत, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज्यामध्ये 2019 साली महाविकासआघाडीचा प्रयोग झाला तेव्हा राहुल गांधी शिवसेनेसोबत जाण्यासाठी फारसे उत्सुक नव्हते. अखेर शरद पवार यांनी सोनिया गांधींशी चर्चा केली, त्यानंतर राज्यातल्या काँग्रेस आमदारांनीही सोनिया गांधींपुढे सरकारमध्ये सामील व्हायचा आग्रह धरला, त्यामुळे काँग्रेस महाविकासआघाडीमध्ये सामील झाली. या अडीच वर्षांच्या काळात राहुल गांधी महाविकासआघाडीच्या प्रयोगाबाबतही फारसे बोलताना दिसले नाहीत.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Eknath Shinde, Priyanka gandhi, Rahul gandhi, Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या