Home /News /maharashtra /

भाजपने टाकला राष्ट्रवादीचाच डाव, सत्तेत सहभागी होऊन वापरणार 'पवार'नीती!

भाजपने टाकला राष्ट्रवादीचाच डाव, सत्तेत सहभागी होऊन वापरणार 'पवार'नीती!

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) झाले आहेत, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उपमुख्यमंत्री करण्याची रणनिती भाजपने (BJP) का आखली? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 30 जून : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह असलेल्या 39 शिवसेना आमदार आणि 11 अपक्षांनी बंड केलं, ज्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, हे जवळपास निश्चित मानलं जात होतं, पण भाजपने राजकीय बॉम्ब फोडला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील हेच सांगताना फडणवीसांनी आपण मात्र या मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही असं सांगितलं. सत्तेत सहभागी न होण्याच्या फडणवीसांच्या या घोषणेनंतर काही तासांमध्येच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी फडणवीसांना मंत्रिमंडळात सहभागी व्हायला सांगितलं. यानंतर अमित शाह यांनीही ट्वीट करून फडणवीस या जबाबदारीसाठी तयार झाले असल्याचं सांगितलं. एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली. यानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपची राष्ट्रवादीसारखीच रणनिती भाजपने स्वत:चे 106 आमदार असतानाही ही रणनिती का अवलंबली, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भाजपने अवलंबलेली ही रणनिती शरद पवार यांनी राष्ट्रवादीसारखीच असल्याचंही बोललं जात आहे. 1999 ते 2014 आणि त्यानंतर 2019 साली राष्ट्रवादी जेव्हा सत्तेत सहभागी झाली तेव्हा त्यांनी मुख्यमंत्रीपद नाकारलं, पण गृहखातं, अर्थ खातं यांच्यासारखी महत्त्वाची खाती सांभाळली. आता देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यावर स्वत: गृहमंत्री होणार का, तसंच अर्थमंत्री भाजपचाच होणार का, याबाबतही चर्चा सुरू झाल्या आहेत. येत्या काही दिवसांमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांबाबत निर्णय होणार आहे, त्यावेळी विधानसभा अध्यक्षाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BJP, Devendra Fadnavis, Eknath Shinde

    पुढील बातम्या