'त्या' रात्री नेमकं काय घडलं? देवेंद्र फडणवीसांनी अखेर उलगडलं राजकारण

'त्या' रात्री नेमकं काय घडलं? देवेंद्र फडणवीसांनी अखेर उलगडलं राजकारण

23 नोव्हेंबरच्या सकाळी अचानक महाराष्ट्राला राजकीय धक्का देणारी बातमी आली आणि कुणाच्याही लक्षात यायच्या आत मुख्यमंत्रिपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस आले. तीन दिवसात पायउतारही झाले. पण 22 नोव्हेंबरच्या रात्री नेमकं काय घडलं हे त्यांनीच एका मुलाखतीत उलगडलं.

  • Share this:

मुंबई, 7 डिसेंबर : 23 नोव्हेंबरच्या सकाळी अचानक महाराष्ट्राला राजकीय धक्का देणारी बातमी आली आणि कुणाच्याही गावी नसताना मुख्यमंत्रिपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस आले. मी पुन्हा येईन असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी हे दुसऱ्यांदा मिळालेलं पद अवघ्या तीन दिवस टिकवलं आणि अखेर राजीनामा दिला. पण अजित पवारांना बरोबर घेऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय एका रात्रीत कसा झाला, त्या रात्री नेमकं काय झालं त्याचा घटनाक्रम माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत उलगडला.

झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी कबुल केलं की, एका रात्रीत असे मोठे निर्णय होत नसतात. फडणवीस म्हणाले, "दोन दिवस आधी ही चर्चा झाली. काही फिलर्स जात होते. आमच्या नेतृत्वाच्या स्तरावर काही गोष्टी घडत होत्या. पण स्पष्ट चर्चा अशी झालेली नव्हती." शपथविधीच्या आधी 2 दिवस अजित पवारांबरोबर चर्चा झाली होती, हे स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले, "22 तारखेला रात्री ज्या वेळी या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार आमच्याकडे आले, आणि काँग्रेस- राष्ट्रवादी- शिवसेना या तीन पक्षांचं सरकार चालू शकत नाही, असं वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं, त्या वेळी आम्ही सरकार स्थापनेची तयारी सुरू केली. राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांचं मतही तसंच आहे, असं अजित पवार म्हणाले.

वाचा - 'जय महाराष्ट्र' म्हणत एकनाथ खडसेंनी दिला 'वेगळा विचार' करण्याचा भाजपला इशारा

"आम्ही सगळे भाजपबरोबर यायला तयार आहोत. कारण स्थिर सरकार आवश्यक आहे, असं अजित पवार म्हणाले. त्यांनी आमदारांच्या सह्यांचं पत्रही आणलं होतं. माझं काही आमदारांशी बोलणंही करून दिलं."

अजित पवारांवर विसंबून सरकार स्थापना

आम्ही त्यांच्याबरोबर जायला हवं की नको यावर वाद होऊ शकतात, पण त्या वेळी तो गनिमीकाव्याचा डाव होता, असं म्हणता येईल. पण तो डाव फसला, असं फडणवीस यांनी या मुलाखतीत कबूल केलं. "राजकारणात कधीकधी गनिमीकावा खेळावा लागतो. तो आमचा फसला. पण त्या वेळी तो आवश्यक वाटला", असं ते म्हणाले.

वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'या' कामासाठी राज्यपालांना केली विनंती

"सगळ्यात मोठ्या पक्षाला या तीन पक्षांनी बाजूला काढलं होतं. जनादेश डावलून ते राजकारण करत होते. जनतेपुढे आम्ही एकत्र असल्याचा शब्द देत लढलो. तो शब्द मोडला त्याचं काय? असा सवालही फडणवीस यांनी केला. आपण अजित पवारांवर विसंबून सरकार स्थापन केलं. ज्या वेळी त्यांनी भाजपबरोबर येण्यास असमर्थता व्यक्त केली, त्यावेळी मीसुद्धा राजीनामा दिला, असं ते म्हणाले.

'साधा फोनही घेतला नाही ही खंत कायम राहील'

शिवसेनेबरोबरच सत्तास्थापना करायची आमची मानसिकता होती. कारण तसाच जनतेचा कौल होता. मी स्वतः अगदी प्रामाणिकपणे चर्चा व्हावी यासाठी कसून प्रयत्न केले. उद्धवजींबरोबर चांगली मैत्री आहे. मी घरी येतो, आपण बोलू, मार्ग काढू असे निरोप दिले. पण उद्धवजींनी माझा साधा फोन घेण्याचंही टाळलं, ही खतं मनात नेहमी राहील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

----------------

अन्य बातम्या

VIDEO : हैदराबाद Encounter वर सरन्यायाधीशांचं मोठं विधान!

हैदराबाद Encounter : आरोपीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास पत्नीचा नकार

सुटकेसमध्ये सापडलेल्या 'त्या' अवयवांचा लागला छडा, मुलीनेच काढला बापाचा काटा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2019 08:33 PM IST

ताज्या बातम्या