काँग्रेसचे आमदार भाजमध्ये जाणार का? ही आहे अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

काँग्रेसचे आमदार भाजमध्ये जाणार का? ही आहे अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

'भाजप अनेक आमदारांना गळ घालण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आमदार पक्ष सोडून जाणार नाहीत.'

  • Share this:

मुंबई 29 मे : लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आमदार पक्ष बदलतील अशी शक्यता आहे. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही शक्यता फेटाळून लावली. काँग्रेसचा कुठलाही आमदार पक्ष सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

अशोक चव्हाण म्हणाले, काँग्रेस पक्षातून बाहेर जातील यात तथ्य नाही. मी अनेक आमदारांशी संपर्क केला आहे, त्यांच्याशी बोलणं झालं आहे त्यामुळे काळजीचं कारण नाही असंही ते म्हणाले. भाजप अनेक आमदारांना गळ घालण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आमदार पक्ष सोडून जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं.

मनसेवर निर्णय नाही

शरद पवार आणि मनसे नेते राज ठाकरे यांच्या भेटीवर अशोक चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची मनसेबाबत जी भूमिका होती तीच भूमिका आजही कायम आहे. मंगळवारी झालेल्या आघाडीच्या बैठकीत यावर चर्चा झाली मात्र निर्णय झाला नाही असंही त्यांनी सांगितलं.

राहुल गांधीच अध्यक्षपदी राहावेत

राहुल गांधी हेच अध्यक्षपदावर कायम राहावेत असं मतही अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं. तसा ठराव काँग्रेसच्या बैठकीत करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक इथं मागील 48 तासांत ही बैठक झाली आहे. या भेटीत अनेक राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे.

लोकसभा निवडणूक निकालानंतर मनसेला आघाडीत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर झालेली ही बैठक सुमारे पाऊण तास चालली असल्याची माहिती आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत कोणत्या रणनीतीसह उतरायचे, याबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मनसेच्या नुकत्याच झालेल्या अनौपचारिक बैठकीत राज ठाकरे यांनी लोकसभा निकालांबाबत नेत्यांची मते जाणून घेतली आहेत. त्यामुळे आगामी काळात राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा मोठा पराभव झाला. या पराभवानंतर राज ठाकरेंवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कारण राज यांनी मोदी सरकारविरोधात राज्यात अनेक ठिकाणी सभा घेतल्या होत्या. राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या जवळपास सर्व ठिकाणी युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत.

First published: May 29, 2019, 5:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading