मंत्रालयासमोरचा तो बोर्ड एका आठवड्यानंतरही रिकामा, सुप्रिया सुळेंनी Photo दाखवला!
मंत्रालयासमोरचा तो बोर्ड एका आठवड्यानंतरही रिकामा, सुप्रिया सुळेंनी Photo दाखवला!
महाराष्ट्रामध्ये (Maharashtra Politics) सत्ताबदल होऊन एक आठवडा झाला आहे, पण अजूनही एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. या मुद्द्यावरूनच राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नव्या सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
मुंबई, 7 जुलै : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra Politics) सत्ताबदल होऊन एक आठवडा झाला आहे, पण अजूनही एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. 30 जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर नव्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होईल, असं शिंदे आणि फडणवीस यांनी सांगितलं. या मुद्द्यावरूनच राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नव्या सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयासमोरच्या एका मोठ्या बोर्डचा फोटो ट्वीट केला आहे. 'मंत्रालयासमोर हा बोर्ड गेली कित्येक वर्ष कामावर जाताना बघते. महाराष्ट्र सरकारने काय कामं केली, हे या बोर्डवर लिहिलं जायचं. मागच्या एका आठवड्यापासून हा बोर्ड रिकामा आहे, आजही तो रिकामाच आहे,' असं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
Have seen this board opposite Mantrayala for many years while going to work daily showing the work done by Government of Maharashtra.
It has been BLANK for a week.
Even today it is BLANK. pic.twitter.com/xzSdcerwyE
दरम्यान शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या एक-दोन दिवसांमध्ये होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आषाढी एकादशीआधी भाजप आणि शिंदे गटातले 8-10 आमदार शपथ घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सह्याद्री अतिथीगृहात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची चर्चा होणार आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये शिंदे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या 40 आणि अपक्ष अशा जवळपास 50 पेक्षा जास्त आमदारांनी बंड केलं. आमदारांच्या या बंडामुळे राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत मागच्या सरकारमधले 8 मंत्रीही सहभागी होते, त्यामुळे त्यांनाही नव्या मंत्रीमंडळात आपल्याला स्थान असेल अशी अपेक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.