Home /News /maharashtra /

8 पैकी 4 विरोधी पक्षनेत्यांनी सोडला पक्ष, तर दोघं भाजपजवळ, यंदा इतिहास बदलणार का...?

8 पैकी 4 विरोधी पक्षनेत्यांनी सोडला पक्ष, तर दोघं भाजपजवळ, यंदा इतिहास बदलणार का...?

महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागच्या 20 दिवसांमध्ये मोठे उलटफेर झाले आहेत. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकासआघाडी सरकार कोसळलं. अजित पवार (Ajit Pawar) यांची विरोधी पक्षनेते (Leader of Opposition) म्हणून निवड करण्यात आली.

पुढे वाचा ...
    मुंबई, 4 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागच्या 20 दिवसांमध्ये मोठे उलटफेर झाले आहेत. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकासआघाडी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होतील, असं वाटत होतं पण भाजपने एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करत फडणवीसांना उपमुख्यमंत्री केलं. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर रविवारी राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली, तर सोमवारी एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध केलं. याच विशेष अधिवेशनात अजित पवार (Ajit Pawar)  यांची विरोधी पक्षनेते (Leader of Opposition) म्हणून निवड करण्यात आली. विरोधी पक्षनेता आणि पक्ष बदलणं हे मागच्या काही काळातलं समीकरणच झालं आहे, त्यामुळे यावेळी हा इतिहास बदलणार का इतिहासाची पुनरावृत्ती होणार, असा प्रश्न आहे. 2019 साली महाविकासआघाडी सरकार स्थापन व्हायच्या आधी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती, पण शरद पवारांनी अजित पवारांचं हे बंड तीनच दिवसांमध्ये मोडून काढलं. विरोधी पक्षनेत्यांचा इतिहास 1999 म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रात 8 विरोधी पक्षनेते झाले, यांच्यातल्या 4 जणांनी स्वत:चा पक्ष सोडला तर दोघं भाजपच्या जवळ गेले. मधुकर पिचड, नारायण राणे आणि राधाकृष्ण विखे पाटील हे एकेकाळी विरोधी पक्षनेते होते, पण राणे यांनी शिवसेनेतून काँग्रेस आणि मग काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. राधाकृष्ण विखे पाटील यांनीही काँग्रेससोडून भाजपचं कमळ हातात घेतलं. तर एकनाथ खडसे यांनीही भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. म्हणजेच मागच्या काही वर्षांमधल्या 4 विरोधी पक्षनेत्यांनी त्यांचा पक्षच बदलला आहे. रामदास कदम हेदेखील 2004 ते 2009 या काळात विरोधी पक्षनेते होते, पण तेदेखील काही काळापासून शिवसेनेमध्ये नाराज आहेत. रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम यांनीही शिवसेनेविरुद्ध बंड करत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. 2014 साली देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होते, पण आता तेदेखील भाजपच्या जवळ गेले आहेत. मागच्या 8 विरोधी पक्षनेत्यांकडे बघितलं तर देवेंद्र फडणवीस आणि विजय वडेट्टीवार या दोघांनीच विरोधी पक्षनेता झाल्यानंतर पक्ष बदलेला नाही. विजय वडेट्टीवार हे सुरूवातीला शिवसेनेमध्ये होते, पण नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पण त्यांचा हा प्रवेश विरोधी पक्षनेता व्हायच्या बरीच वर्ष आधी झाला होता. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते मधुकरराव पिचड- 25 मार्च 1995 ते 15 जुलै 1999 नारायण राणे- 22 ऑक्टोबर 1999 ते 19 ऑक्टोबर 2004 आणि 6 नोव्हेंबर 2004 ते 12 जुलै 2005 रामदास कदम- 1 ऑक्टोबर 2005 ते 3 नोव्हेंबर 2009 एकनाथ खडसे- 11 नोव्हेंबर 2009 ते 8 नोव्हेंबर 2014 एकनाथ शिंदे- 12 नोव्हेंबर 2014 ते 5 डिसेंबर 2014 राधाकृष्ण विखे-पाटील- 23 डिसेंबर 2014 ते 4 जून 2019 विजय वडेट्टीवार- 24 जून 2019 ते 9 नोव्हेंबर 2019 देवेंद्र फडणवीस- 1 डिसेंबर 2019 ते 29 जून 2022
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ajit pawar, BJP, Devendra Fadnavis

    पुढील बातम्या