मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

29 जूनची ती चूक ठाकरेंना महागात पडणार? खडसेंच्या विधानाचा अर्थ काय?

29 जूनची ती चूक ठाकरेंना महागात पडणार? खडसेंच्या विधानाचा अर्थ काय?

 शिवसेना हा जुना पक्ष असून धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेला मिळावा ही अपेक्षा आहे.

शिवसेना हा जुना पक्ष असून धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेला मिळावा ही अपेक्षा आहे.

महाराष्ट्राच्या सत्तानाट्याची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India
  • Published by:  Shreyas

जळगाव, 27 सप्टेंबर : महाराष्ट्राच्या सत्तानाट्याची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात झाली. शिवसेना कुणाची, तसंच धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार, याबाबतचा निर्णय घ्यायला निवडणूक आयोगाला मोकळीक असल्याचं सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर स्पष्ट झालं आहे. सुप्रीम कोर्टाचा हा निकाल म्हणजे उद्धव ठाकरे यांना धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

'घटनापीठात उद्धव ठाकरेंनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देण्यात आला मात्र आमदारांच्या अपात्रतेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. चिन्हाबाबत निवडणूक आयोगाची भूमिका काय आहे, हे आयोगाच्या निर्णयानंतर स्पष्ट होईल. शिवसेना हा जुना पक्ष आहे, त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेला मिळावं,' अशी अपेक्षा एकनाथ खडसेंनी व्यक्त केली.

'16 आमदार अपात्र झाले तर हे सरकार कोसळू शकतं. या 16 आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा आहेत,' असं खडसे म्हणाले, पण हे सांगतानाच खडसे यांनी मोठं विधान केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी विश्वासमताला सामोरं जाऊन अधिवेशनात संख्याबळाची चाचणी केली असती तर अधिक उचित ठरलं असतं, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायला सांगितलं, पण त्याआधीच उद्धव ठाकरे यांनी 29 जूनला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

पृथ्वीराज चव्हाणही तेच म्हणाले

काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनीही उद्धव ठाकरेंनी बहूमत चाचणीला सामोरं जाऊन राजीनामा द्यायला पाहिजे होता, असं वक्तव्य केलं होतं. हे सांगताना पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षांतरबंदी कायद्याची बाजू मांडली होती.

'पक्षांतर बंदी घट्ट करण्याची संधी उद्धव ठाकरेंना होती, पण त्यांनी घाई गडबडीमध्ये राजीनामा दिला, ती फार मोठी चूक झाली. त्यांनी विधिमंडळाला सामोरं जायला पाहिजे होतं, आपलं म्हणणं मांडण्याची गरज होती. विधानसभेत चर्चा झाली असती, काँग्रेस-राष्ट्रवादीला तीन पक्षांचं सरकार का स्थापन केलं, हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगता अलं असतं. तसंच भाजपचा यामध्ये काय रोल आहे, हे कदाचित स्पष्ट झालं असतं,' असं वक्तव्य चव्हाण यांनी केलं.

'वाजपेयींसारखं भाषण करून निघून जाणं हा पर्याय होता. तेही न करता मतदान करून घ्यायला पाहिजे होतं. मतदानामध्ये त्यांना मतं कमी पडली असती आणि त्यांचा पराभव जरी झाला असता, तरी पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन जनतेसमोर झालं असतं. प्रतोदांनी काढलेल्या व्हिपचं शिवसेनेच्या फुटीर गटाकडून उल्लंघन झाल्याचं लाईव्ह टीव्हीवर दिसलं असतं, ज्यामुळे आणखी अडचण निर्माण झाली असती,' असं चव्हाण म्हणाले.

First published:

Tags: Cm eknath shinde, Eknath khadse, Shivsena, Uddhav Thackeray