Home /News /maharashtra /

मुंडे भावा-बहिणींची फडणवीस-पवारांकडून निराशा, धनंजय विरोधी पक्षनेते नाहीत, पंकजांचं काय?

मुंडे भावा-बहिणींची फडणवीस-पवारांकडून निराशा, धनंजय विरोधी पक्षनेते नाहीत, पंकजांचं काय?

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये (Maharashtra Politics) मागच्या 20 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर उलथापालथ झाली आहे. यानंतर अजित पवार यांना विरोधी पक्षनेतेपद मिळालं आहे. आधी या पदावर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या नावाची चर्चा होती. आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार का, याची उत्सुकता आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 4 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये (Maharashtra Politics) मागच्या 20 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर उलथापालथ झाली आहे. उद्धव ठाकरे यांचं महाविकासआघाडी सरकार कोसळून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री झाले आहेत. काल म्हणजेच रविवारी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली, तर आज एकनाथ शिंदे यांनी बहुमताची चाचणी जिंकली. विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे यांचं बहुमत सिद्ध झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे भाजपनंतर सर्वाधिक आमदार असल्यामुळे त्यांचा विरोधी पक्षनेते पदावर दावा होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांच्यासोबतच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या नावाचीही चर्चा होती, पण राष्ट्रवादी काँग्रेसने ही माळ अजित पवारांच्या गळ्यात घातली. एकीकडे धनंजय मुंडे यांना विरोधी पक्षनेतेपदाने हुलकावणी दिली असली, तरी त्यांची बहीण पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचं काय होणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे, त्यामुळे पंकजा मुंडे यांना त्यांच्या मंत्रिमंडळात मोठं पद मिळणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पंकजा मुंडे मंत्री झाल्या तर पुढच्या 6 महिन्यांमध्ये त्यांना विधानसभा किंवा विधान परिषद निवडणूक लढवून जिंकावं लागेल. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाच, पण विधान परिषदेचं सदस्यत्वही सोडलं, त्यामुळे या जागेवर भाजप पंकजा मुंडेंना संधी देणार का, यादेखील चर्चा आहेत. मुंडे बहीण-भावांचा वाद 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. यानंतर महाविकासआघाडी सरकारमध्ये धनजंय मुंडे यांना सामाजिक न्यायमंत्री पद देण्यात आलं. या पराभवानंतर पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चाही झाल्या, पण प्रत्येकवेळी भाजपकडून हे फेटाळून लावण्यात आलं. फडणवीस-मुंडे मैत्री एकीकडे फडणवीस आणि पंकजा यांच्यातल्या वादाबाबत बोललं जात असतानाच, दुसरीकडे फडणवीस आणि धनजंय मुंडे यांच्या मैत्रीच्या घटनाही समोर आल्या. महाविकासआघाडी सरकार स्थापन व्हायच्या आधी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली. शपथविधीआधी अजित पवार राष्ट्रवादीच्या काही आमदारांसोबत धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरच होते. यानंतर करुणा मुंडे प्रकरणात धनंजय मुंडे अडचणीत आलेले असतानाही फडणवीस यांनी या मुद्द्यावर बोलणं टाळलं. आता देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही धनंजय मुंडे त्यांना भेटायला सागर या त्यांच्या बंगल्यावर गेले होते.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Dhananjay munde, Pankaja munde

    पुढील बातम्या