Home /News /maharashtra /

'ते पुन्हा येत आहेत, त्यांना...', फडणवीसांच्या शपथविधीवर राऊतांची रिएक्शन

'ते पुन्हा येत आहेत, त्यांना...', फडणवीसांच्या शपथविधीवर राऊतांची रिएक्शन

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा (Uddhav Thackeray Resigns) राजीनामा दिल्यानंतर आता महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस आजच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्याआधी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 30 जून : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा (Uddhav Thackeray Resigns) राजीनामा दिल्यानंतर आता महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राजभवनावर सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी गेले आहेत. यानंतर संध्याकाळी 7 वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. फडणवीसांच्या या शपथविधीबाबत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एवढी घाई, कोणत्या परिस्थितीमध्ये सत्तापरिवर्तन होत आहे, हे महाराष्ट्राने पाहिलं, असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रात एक नवीन राज्य येत आहे, ते पुन्हा येत आहेत, आपल्या सगळ्यांचे मित्र. नवीन मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्याची आपली संस्कृती आणि परंपरा आहे, त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. मागच्या 5-7 वर्षांमध्ये राज्यात सुडाच्या राजकारणाचे पायंडे पाडण्यात आले, ते आता थांबतील, एवढी अपेक्षा आहे. जो कालखंड आपल्याला मिळाला आहे तो महाराष्ट्राच्या हिताच्या चरणी लावा, राजकारण आणि सत्ताकारण बाजूला ठेवा, असा सल्लाही राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या