मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Dasara Melava : ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाणार का शिंदेंच्या? 'शिवसैनिक' दीपाली सय्यद म्हणाल्या...

Dasara Melava : ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाणार का शिंदेंच्या? 'शिवसैनिक' दीपाली सय्यद म्हणाल्या...

दीपाली सय्यद

दीपाली सय्यद

अभिनेत्री आणि शिवसैनिक असलेल्या दीपाली सय्यद या कोणत्या मेळाव्याला हजेरी लावणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर दिपाली सैय्यद यांनी या प्रश्नावर मौन सोडलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 05 ऑक्टोबर : महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन दसरा मेळावे रंगणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी येथे होणार आहे तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा मेळावा दादरच्या शिवाजी महाराज पार्कमध्ये पार पडणार आहे. शिवसेनेच्या या दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्यासाठी मोठं शक्तीप्रदर्शन केलं गेलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येनं लोक दसरा मेळाव्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. या सगळ्यात शिवसेनेचे हे दोन गट एकत्र येण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अभिनेत्री आणि शिवसैनिक असलेल्या दीपाली सय्यद या कोणत्या मेळाव्याला हजेरी लावणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर दिपाली सैय्यद यांनी या प्रश्नावर मौन सोडलं आहे.

दीपाली विचारे यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे या दोघांची फार जवळचे संबंध आहेत. शिंदे आणि ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून लाखो लोक बीकेसी आणि शिवाजी पार्कच्या मैदानावर दाखल झाले आहेत.  दीपाली विचारे नेमकं कोणाच्या मेळाव्याला हजेरी लावणार असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना सांगितलं, 'मला आवडलं असतं दोन्ही मेळाव्यात जायला. 10 मिनिट इकडे 10 मिनिटं तिकडे. अशा दोन्ही मेळाव्यांना मी गेले असते. पण मी मस्तपैकी घरी बसून टीव्हीवर दोन फोन बाजूला ठेवून दोघांची भाषणं ऐकणार आहे'.

हेही वाचा - Dasara Melava : एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात स्टेजवर स्पेशल खूर्ची, त्या जागेवर कुणीच बसणार नाही

पुढे दीपाली सय्यद म्हणाल्या, 'शिवसेनेचे दोन मेळावे होणार याविषयी चांगलंही वाटतय आणि वाईटही वाटतंय. चांगलं वाटतंय कारण दोन्हीकडे वेगळाच माहोल आणि आनंदाचं वातावरण आहे. दसऱ्याचा उत्साह आहे. पण आपलेच दोन मेळावे होत असल्यानं तुझी ताकद मोठी माझी ताकद अशी चढाओढ आहे'.

दीपाली सय्यद यांचं भावनिक आवाहन  

यावेळी बोलताना दीपाली सय्यद यांनी शिंदे आणि ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी पुन्हा एकदा भावनिक आवाहन केलं. त्या म्हणाल्या, 'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा हात ज्यांच्या डोक्यावर आहे त्यांनी लवकरात लवकरात पुढं जावं आणि सर्वांना एकत्र आणून हे मिटवावं. तुटलेलं घर एकत्र करावं'.

First published:

Tags: Cm eknath shinde, Eknath Shinde, Maharashtra News, Maharashtra political news, Maharashtra politics