मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अब्दुल सत्तार गोत्यात, पण मुलं, सासू, जावयामुळे महाराष्ट्राच्या 4 मुख्यमंत्र्यांना द्यावा लागला होता राजीनामा

अब्दुल सत्तार गोत्यात, पण मुलं, सासू, जावयामुळे महाराष्ट्राच्या 4 मुख्यमंत्र्यांना द्यावा लागला होता राजीनामा

माजी मंत्री आणि शिंदे गटाला जाऊन मिळालेले शिवसेना आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) चांगलेच अडचणीत आले आहेत. जवळच्या नातेवाईकांमुळे अडचणीत आलेले अब्दुल सत्तार हे काही पहिलेच राजकारणी नाहीत. मुलं, सासू आणि जावयामुळे महाराष्ट्राच्या चार मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
मुंबई, 8 ऑगस्ट : माजी मंत्री आणि शिंदे गटाला जाऊन मिळालेले शिवसेना आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) चांगलेच अडचणीत आले आहेत. सत्तार यांच्या मुलांची नावं टीईटीमध्ये (TET Scam) सेवामुक्त झालेल्या बोगस शिक्षकांच्या यादीत आल्यामुळे खळबळ माजली आहे. अपात्र असताना पैसे देऊन पात्र होऊन नोकरी मिळवण्याचा हा घोटाळा आहे. अब्दुल सत्तार यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत, पण या आरोपांमुळे सत्तार यांचं संभाव्य मंत्रिपद धोक्यात आलं आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर येत्या काही दिवसांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळामध्ये सत्तार यांचं नाव आघाडीवर होतं, पण आता या घोटाळ्यात नाव आल्यामुळे त्यांचा मंत्रिपदाचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. जवळच्या नातेवाईकांमुळे अडचणीत आलेले अब्दुल सत्तार हे काही पहिलेच राजकारणी नाहीत. मुलं, सासू आणि जावयामुळे महाराष्ट्राच्या चार मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. काहीच महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना त्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या संपत्तीवरही इडीने कारवाई केली होती, त्यामुळे उद्धव ठाकरे अडचणीत आले होते. महाविकासआघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांनाही एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. शिवाजीराव निलंगेकर पाटील शिवाजीराव निलंगेकर पाटील (Shivajirao Nilangekar Patil) यांच्यावर त्यांच्या मुलीला मेडिकलसाठी ऍडमिशन मिळावी म्हणून मार्क वाढवण्याचे आरोप करण्यात आले. 1986 सालच्या या प्रकरणात विरोधी पक्षात असताना शरद पवारांनी मुख्यमंत्री निलंगेकर यांना अडचणीत आलं होतं. मुंबई उच्च न्यायालयानेही निलंगेकर यांच्यावर ताशेरे ओढले. मुलीचे मार्क वाढवल्याच्या आरोपामुळे अखेर शिवाजीराव निलंगेकर पाटील यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मनोहर जोशी 1995 साली महाराष्ट्रात पहिल्यांदाच शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं. यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशी (Manohar Joshi) यांना मुख्यमंत्री केलं. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर मनोहर जोशी त्यांचे जावई गिरीश व्यास (Girish Vyas) यांच्यामुळे अडचणीत आले. पुण्याच्या प्रभात रोडवर असलेल्या प्लॉटवर शाळेचं आरक्षण असतानाही 30 हजार स्क्वेअर फुटाचा प्लॉट मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना जावयाला दिल्याचा आरोप झाला. या प्लॉटवर शाळेचं आरक्षण हटवून 11 मजली इमारत बांधण्यात आली. निलंगेकरांप्रमाणेच या प्रकरणातही मुंबई उच्च न्यायालयाने मनोहर जोशी यांच्यावर ठपका ठेवला. मनोहर जोशींनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करून महापालिका शाळेचं आरक्षण बदललं, तसंच बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यापासून अधिकाऱ्यांना रोखलं, असं मत न्यायालयाने मांडलं, यानंतर मनोहर जोशींना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं.
विलासराव देशमुख मुंबईमध्ये 2008 साली 26 नोव्हेंबरला दहशतवादी हल्ला झाला. पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी ताज हॉटेलसह मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणांना लक्ष्य केलं, त्यावेळी विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) मुख्यमंत्री होते. दहशतवादी हल्ल्यानंतर ताज हॉटेलची पाहणी करण्यासाठी विलासराव देशमुख मुलगा रितेश देशमुख आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यासोबत गेले होते. या पाहणी दौऱ्यामुळे विलासराव देशमुखांवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली, यानंतर विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. अशोक चव्हाण कारगील युद्धात शहीद झालेल्यांच्या विधवा पत्नींसाठी मुंबईच्या कुलाबा भागात एक भूखंड राखीव करण्यात आला होता, पण त्यावर आदर्श नावाची गृहनिर्माण सोसायटी उभारण्यात आली. या सोसायटीमध्ये तत्कालिन मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या सासूच्या नावावर फ्लॅट असल्याचा आरोप झाला. आदर्श प्रकरणामुळे अखेर अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला होता.
First published:

पुढील बातम्या