मुंबई, 1 जुलै : राज्यात अडीच वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचे (BJP) सरकारमध्ये पुनरागमन झाले आहे. भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे उपमुख्यमंत्री झाले. सत्तास्थापनेनंतर भारतीय जनता पक्षानं मुंबईत जोरदार सेलिब्रेशन केले. भाजपाच्या या जल्लोष कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस अनुपस्थित होते. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. फडणवीस हे राज्यातील भाजपाचे पहिल्या क्रमांकाचे नेते आहेत. त्यानंतरही ते प्रदेश भाजपाच्या जल्लोष कार्यक्रमाला अनुपस्थित का राहिले? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
देवेंद्र फडणवीसांसह भाजपाचे दिग्गज नेते या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर हे भाजपाचे दिग्गज नेते या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. सुधीर मुनगंटीवार, मंगलप्रभात लोढा आणि किरीट सोमय्या या भाजपा नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
पवारांनी केला होता इशारा
भाजपच्या केंद्रीय कमिटीने दिलेल्या आदेशानुसार देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली. या सर्व घडामोडींवर राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी फडणवीसांना डिवचलं. भाजपमध्ये एकदा आदेश आला की तो पाळावा लागतो. देवेंद्र फडणवीस राज्याचे पाच वर्ष मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी अडीच वर्ष विरोधी पक्षनेते म्हणून काम केलं. तरीही त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली. हा तर आश्चर्याचा धक्का होता. पण एकदा आदेश झाला की त्यामध्ये तडजोड नाही, असं म्हणत शरद पवारांनी फडणवीसांना टोला लगावला होता.
सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा साधला जनतेशी संवाद; मांडले हे 3 मुद्दे
एकदा आदेश झाला आणि सत्तेची कोणतीही संधी मिळाली की ती स्वीकारायची असते याचं उदाहारण देवेंद्र फडणवीसांनी घालून दिलं आहे", असं देखील शरद पवार म्हणाले होते. पवारांनी हा टोला लगावल्यानंतर 24 तासांच्या आत भाजपच्या मुख्य कार्यक्रमाला फडणवीस गैरहजर राहिल्यानं चर्चा सुरू झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.