LIVE Updates : इक्बाल कासकरला जे.जे. रुग्णालयातून डिस्चार्ज, पोटात दुखत असल्याने केलं होतं दाखल 

कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | August 23, 2022, 19:36 IST |  Mumbai, India
    LAST UPDATED 7 MONTHS AGO

    हाइलाइट्स

    22:57 (IST)

    गद्दार निवडणुकीला सामोरं जायला घाबरतायत, भाजप मुंबईकडे मलई म्हणून बघतंय - आदित्य ठाकरे

    21:12 (IST)

    शिंदे गटाकडून दीड लाख प्रतिज्ञापत्र सादर
    केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र
    शिंदे गटाकडून शिवसेना पक्ष, चिन्हावर दावा

    20:12 (IST)

    ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे मागितला वेळ
    4 आठवड्यांची मुदत आयोगाकडे मागितली
    'निवडणूक आयोगानं कोणताही निर्णय घेऊ नये'
    उद्धव ठाकरेंची केंद्रीय निवडणूक आयोगाला विनंती

    20:10 (IST)

    कोरोना संकटाचा मुकाबला केला, हे संकट तर काहीच नाही, उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला

    माझ्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी राहिली, सत्ता गेली तरी एकत्र आहोत याचं कौतुक, न्यायदेवतेवर आमचा विश्वास, आगामी निवडणुकांसंदर्भात रणनीती ठरवली - उद्धव ठाकरे

    20:10 (IST)

    जे आपले होते तेच आपले शत्रू झाले, आपल्याला संघर्ष करायचाय, संघर्षाला आपण मागे हटणार नाही - उद्धव ठाकरे

    19:53 (IST)

    अजित पवारांचे आभार मानतो - उद्धव ठाकरे
    'अडीच वर्षात आर्थिक गाडा त्यांनी सांभाळला'
    'माझ्या लोकांवर विश्वास टाकला, गैरफायदा घेतला'
    सत्ता गेली तरी एकत्र आहोत याचं कौतुक - ठाकरे
    'कोर्टाचे सरन्यायाधीश आपल्यासाठी शेवटची आशा'
    'मुंबईत भाजपचा पराभव झाल्यास राज्यात संदेश जाईल'
    राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
    'स्था. स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढवायच्या'
    महाविकास आघाडीच्या बैठकीत एकमुखानं निर्णय

    19:39 (IST)

    गोरेगाव पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरण
    डॉ.स्वप्ना पाटकरांची ईडी चौकशी संपली
    सलग 4 तास सुरू होती ईडीकडून चौकशी
    स्वप्ना पाटकरांचा प्रतिक्रिया द्यायला नकार

    19:32 (IST)

    इक्बाल कासकरला जे जे रुग्णालयातून डिस्चार्ज
    पोटात दुखत असल्यानं जेजेमध्ये दाखल केलं होतं
    इक्बाल कासकरला पुन्हा ठाणे कारागृहात पाठवलं

    19:15 (IST)

    मुंबई - टॅक्सी, रिक्षा युनियनचा संपाचा इशारा
    रिक्षा, टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याची मागणी
    किमान भाडं 25 ते 35 रुपये करण्याची मागणी
    टॅक्सी, रिक्षा युनियनचा 15 सप्टेंबरचा अल्टिमेटम

    19:4 (IST)

    'अशीच एकजूट राहिल्यास पुढील काळात वेगळं चित्र'
    आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला प्रतिसाद - अजित पवार
    शिंदे सरकार लोकांना आवडलेलं नाही - अजित पवार
    मंत्रिमंडळात विस्तारानंतर प्रचंड अस्वस्थता - पवार

    कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्