LIVE Updates : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पाचवं सुवर्ण पदक, टेबल टेनिसमध्ये भारतीय पुरुष संघाला मोठा विजय

कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 03, 2022, 00:39 IST
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  23:11 (IST)

  यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त व्हावा - शिंदे
  मी यापूर्वीच आदेश दिलेत - मुख्यमंत्री शिंदे
  'पुण्यातही मंडळांना परवानगीला अडचण नाही ना'
  अशी अपेक्षा व्यक्त करतो - एकनाथ शिंदे
  मंडळांसमोरच मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश
  'परवानगीसाठी उगीच खेटे मारायला लावू नका'
  एकाच वेळी 5 वर्षं परवानगी देऊन टाका - शिंदे
  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुणे पोलिसांना निर्देश
  गणेशोत्सवात फेरीवाल्यांना परवानगी द्या - शिंदे

  22:32 (IST)

  उदय सामंतांच्या गाडीवर भ्याड हल्ला - शिंदे
  'कायदा-सुव्यवस्था राखण्याचं काम सर्वांनी करावं'
  पोलीस कायदेशीर कारवाई करतील - मुख्यमंत्री

  22:19 (IST)

  मुख्यमंत्री शिंदे दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला
  एकनाथ शिंदे श्रीमंत दगडूशेठ बाप्पाच्या चरणी

  21:31 (IST)

  पुण्याच्या कात्रजमध्ये राडा, उदय सामंतांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न, हल्ल्यात सामंतांच्या गाडीची काच फुटली, 

  पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात, सामंतांकडून कोथरुड पोलिसात तक्रार, झालेला प्रकार अतिशय निंदनीय, माझ्या गाडीवरील 

  हल्ला पूर्वनियोजित, राज्याचं राजकारण कोणत्या थराला चाललंय? कुणी हल्ला केला, पोलीस तपास करतील - उदय सामंत

  20:51 (IST)
  जलवाहिनी छेद जोडणी आणि झडपा बदलणे या कामामुळे गुरुवारी 4 ऑगस्टला सकाळी 10 पासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण मुंबई शहर आणि उपनगरात 15 टक्के पाणीकपात तर काही ठराविक परिसरात पाणीपुरवठा होणार नाही, कपातीच्या कालावधीत काटकसरीनं पाणी वापरून सहकार्य करावं - बृहन्मुंबई महापालिका
   
  20:40 (IST)

  येत्या 3 दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार - सूत्र
  सुरुवातीला 15-16 मंत्र्यांचा शपथविधी?
  गृहखातं भाजप स्वत:कडे ठेवण्याची शक्यता
  60:40 फॉर्म्युल्यानुसार मंत्रिमंडळ विस्तार?
  मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी?
  केंद्रातून भाजप नेते शपथविधीला येणार - सूत्र

  20:24 (IST)

  राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पाचवं सुवर्ण

  टेबल टेनिसमध्ये भारतीय पुरुष संघाला सुवर्णपदक

  अंतिम फेरीत भारताची सिंगापूरवर 3-1 अशी मात

  हरमीत देसाई, साथियनची ज्ञानशेखरची कामगिरी निर्णायक

  20:24 (IST)

  तैवानवरून चीन-अमेरिका आमनेसामने
  तैवानच्या मुद्यावरून चीन-अमेरिकेत तणाव
  युक्रेननंतर तैवानमध्येही युद्धाचं सावट
  पेलोसींच्या तैवान दौऱ्याला चीनचा विरोध
  चीनचा विरोध झुगारून पेलोसी तैवानमध्ये
  नॅन्सी पेलोसी अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा

  18:57 (IST)

  पुणे दौऱ्यावर असताना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेजुरी गडावर जाऊन श्री क्षेत्र खंडोबाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीने देव खंडोबाची निशाणी असलेले पारंपरिक घोंगडे अंगावर चढवून मुख्यमंत्र्यांचा आदरपूर्वक सन्मान केला. तसेच यानिमित्ताने खंडोबाचा खंडा हातात घेऊन त्यांनी परंपरेनुसार तो उंचावून दाखवला.

  यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील, आमदार तानाजी सावंत, आमदार दिलीप मामा लांडे, शिवसेना उपनेते आणि आमदार उदय सामंत, माजी आमदार विजयबापू शिवतारे आणि मंदिर समितीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.

  18:55 (IST)

  कॉमनवेल्थमध्ये भारताला आणखी एक 'सुवर्ण'
  लॉन बॉल्समध्ये भारतीय महिला संघाचा विजय
  दक्षिण आफ्रिकेचा 17-10 असा केला पराभव
  कॉमनवेल्थमध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी

  कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स