मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर, अजित पवार पुन्हा नाराज?

मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर, अजित पवार पुन्हा नाराज?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार पुन्हा एकदा नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • Share this:

सागर कुलकर्णी (प्रतिनिधी)मुंबई, 24 डिसेंबर: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर गेल्यानं अजित पवार पुन्हा नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंगळवारी मंत्रिमंडळाचा विस्ताव व्हावा यासाठी अजित पवार आग्रही होते. पण शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात समन्वय न झाल्यानं अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे गेल्याची माहिती मिळत आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार महिना अखेरीस अथवा नव्या वर्षात होणार असल्याची चर्चा होत आहे. डिसेंबर अखेर आता शपथविधी करावा अशी काँग्रेसची भूमिका आहे. कारण काँग्रेसकडून कुणाल मंत्रिपद द्यायची याबाबत अद्याप अंतिम यादी ठरली नाही. त्यामुळ राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट नाराज असल्याची माहिती मिळत आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलण्याबाबत एकमेकांकडे बोट दाखवत असताना अजित पवारासह अनेक इच्छुक मंत्री पदाची शपथ घेणार आमदार मात्र नारज झाले आहेत.

वाचा-Jharkhand Election Result हेमंत सोरेन यांच्यासाठी मुख्यमंत्री होणं नव्हतं सोपं..

काँग्रेसमधून कोणाला मंत्रिपद द्यायची याची अंतिम यादी ठरवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह काही नेते दिल्लीत दाखल झाले आहे. दिल्लीत काँग्रेसची यादी या दोन दिवसांत फायनल झाल्यास मंत्रिमंडळ विस्तार महिन्या अखेरीस केल्या जाण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. तर काँग्रेसनं निर्णय घेतला नाही तर कदाचित हा विस्तार नव्या वर्षाच्या सुरुवातील केला जाईल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. काँग्रेसकडून फारच उशीर होत असेल तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना शपथ दिली जाऊ शकते असेही काही नेत्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान दिल्लीत सोमवारी बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली. यावेळी माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांना मंत्रिमंडळात घ्यायचे काही नाही याबाबत अद्याप राज्यातील काँग्रेस नेत्यांसमोर पेच असल्यानं त्याबाबत विचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

वाचा-खूशखबर! पेट्रोल होणार 10 रुपयांनी स्वस्त, मोदी सरकार उचलणार मोठं पाऊल

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रत्येकी दोन जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. बहुमत सिध्द करणं आणि हिवाळी अधिवेशन चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी विस्तार थांबविण्यात आला होता. विस्तारात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो अजित पवारांच्या समावेशाचा. त्यांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाणार का? याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. त्यांना उपमुख्यमंत्रिपद मिळालं नाही तर राष्ट्रवादीत नाराजी उफाळून येवू शकते अशीही शक्यता व्यक्त केली जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 24, 2019 08:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading