मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची 'सुप्रीम' सुनावणी होणार LIVE, घरबसल्या पाहता येणार युक्तीवाद!

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची 'सुप्रीम' सुनावणी होणार LIVE, घरबसल्या पाहता येणार युक्तीवाद!

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी उद्या म्हणजेच मंगळवार 27 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात सुरू होणार आहे. मुख्य म्हणजे ही सुनावणी नागरिकांना घरबसल्याही बघता येणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Shreyas

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी उद्या म्हणजेच मंगळवार 27 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात सुरू होणार आहे. मुख्य म्हणजे ही सुनावणी नागरिकांना घरबसल्याही बघता येणार आहे. उद्यापासून सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाच्या सुनावण्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. उद्या ज्या घटनापीठाच्या सुनावण्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे, त्यामध्ये ईडब्ल्यूएस आरक्षण, महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष तसंच दिल्ली विरुद्ध केंद्र सरकार यांच्यातल्या सुनावण्यांचा समावेश आहे. घटनापीठाच्या सुनावण्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात यावं, असा निर्णय कोर्टाच्या बैठकीत झाल्याची माहिती न्यूज18 ला सूत्रांनी दिली आहे.

उद्याच्या सुनावणीमध्ये काय होणार?

महाराष्ट्राचं प्रकरण कोर्टात कामकाजात समावेश केला आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. 27 तारखेला सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राचे प्रकरण दुसऱ्या क्रमांकावर आहे. निवडणूक आयोगाची कार्यवाही चालू ठेवायची की नाही याबाबत सुरुवातीला फैसला अपेक्षित आहे. 7 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं पुढील सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश दिले होते. त्यामुळे 27 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट महत्त्वाचे आदेश देण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाच्या कारवाईशिवाय 12 आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा, विधानसभा उपाध्यक्षांचे अधिकार, राज्यपालांनी बोलावलेलं अधिवेशन, पक्षांतरबंदी कायदा आणि 10 वे शेड्युल, या मुद्द्यांवरही सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजूंनी खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Cm eknath shinde, Shivsena, Uddhav Thackeray