Home /News /maharashtra /

एकनाथ शिंदेंच्या बंडाला 48 तास, घडामोडी अचानक का थंडावल्या? पडद्यामागे चर्चा सुरू, पण नेमक्या कुणाच्या?

एकनाथ शिंदेंच्या बंडाला 48 तास, घडामोडी अचानक का थंडावल्या? पडद्यामागे चर्चा सुरू, पण नेमक्या कुणाच्या?

सोमवारी विधानपरिषदेच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या (Shivsena) नाराज आमदारांसोबत बंड केलं. या बंडाला आता 48 तासांपेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे, पण तरीही सगळ्याच बाजूंनी घडामोडी अत्यंत संथ गतीने घडामोडी घडत आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 22 जून : सोमवारी विधानपरिषदेच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या (Shivsena) नाराज आमदारांसोबत बंड केलं. या बंडाला आता 48 तासांपेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे, पण तरीही सगळ्याच बाजूंनी घडामोडी अत्यंत संथ गतीने घडामोडी घडत आहेत, त्यामुळे पडद्यामागे ज्या चर्चा सुरू आहेत, पण त्या नेमक्या कुणामध्ये सुरू आहेत, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. आमदारांचा प्रवास एकनाथ शिंदे सोमवारी रात्री मुंबईहून सूरतला गेले, यानंतर मंगळवारी रात्री शिंदे आणि शिवसेनेमधले नाराज आमदार सूरतवरून गुवाहाटीला गेले. मागच्या दोन दिवसांपासून आमदारांचा प्रवासच सुरू आहे. शिंदेंचं दोन वेळा शक्तीप्रदर्शन बंड केल्यानंतर 48 तासांमध्ये एकनाथ शिंदे यांनी दोन वेळा शक्तीप्रदर्शन केलं. मंगळवारी रात्री सूरतच्या हॉटेलमधून एकनाथ शिंदे आणि बंड केलेल्या शिवसेना आमदारांचे फोटो समोर आले. मग आज म्हणजेच बुधवारी शिवसेनेने काढलेला व्हिप अवैध आहे, तसंच भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती करत असल्याचं सांगत शिंदेंनी शिवसेनेला आव्हान देण्यात आलं. चर्चांवर चर्चा एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सोमवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि महाविकासआघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. शरद पवार मंगळवारी दिल्लीहून मुंबईमध्ये आले आणि त्यांनीही राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठका घेतल्या. काँग्रेसचे कमलनाथही त्यांच्या नेत्यांसोबत मुंबईत चर्चा करत होते. या सगळ्या पिक्चरमधून भाजप बाहेर असली तरी त्यांच्याही जोरदार बैठका सुरू आहेत. या सत्तानाट्यात देवेंद्र फडणवीसही दिल्लीला जाऊन आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी फेसबूक लाईव्हमधून भावनिक साद घातल्यानंतर शरद पवारही उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी गेले. कोरोनाची एण्ट्री राज्यात सत्तानाट्य सुरू असताना अचानक कोरोनाची बुधवारी एण्ट्री झाली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह आली.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या