Home /News /maharashtra /

'मुख्यमंत्री असावा तर उद्धव ठाकरेंसारखा,' सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

'मुख्यमंत्री असावा तर उद्धव ठाकरेंसारखा,' सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

महाराष्ट्रामध्ये सत्तानाट्य (Maharashtra Politics) सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्री असावा तर उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासारखाच असावा, असं वक्तव्य केलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 28 जून : महाराष्ट्रामध्ये सत्तानाट्य (Maharashtra Politics) सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्री असावा तर उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासारखाच असावा, असं वक्तव्य केलं आहे. 'मला उद्धव ठाकरे यांचा अभिमान आहे. बाळासाहेब नसताना उद्धव ठाकरेंनी आमदारांना भावनिक आवाहन केलं. मी भविष्य वर्तवू शकत नाही, पण कुटुंबातून कोण सोडून जात असेल, तर त्यांना परत आणण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत,' असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 'मी उद्धव ठाकरे यांचं ट्वीट बघितलं. ठाकरे कुटुंबासोबत माझ्या भावना जोडल्या गेल्या आहेत. सरकार येतील आणि जातील पण ही नाती पुढे अशीच सुरू राहतील,' अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. 'एकनाथ शिंदे यांच्याकडे 144 चा बहुमताचा आकडा नाही. त्यांच्याकडे फक्त 50 आमदार आहेत, असं मी ऐकलं. एकनाथ शिंदे यांच्याकडचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात बोलत आहेत. दीपक केसरकर राष्ट्रवादीमध्ये होते. उदय सामंत युथ विंगमध्ये होते. त्यांनी राष्ट्रवादी सोडली तेव्हा आम्ही त्यांच्याबद्दल वाईट बोललो नाही, पण आता ते आमच्यावर टीका करत आहेत, याचा जास्त त्रास होतो,' असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: NCP, Shivsena, Supriya sule, Uddhav thackeray

    पुढील बातम्या