फडणवीस सरकारचं भवितव्य आज ठरणार? सत्तापेचावर सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण निर्णय

फडणवीस सरकारचं भवितव्य आज ठरणार? सत्तापेचावर सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण निर्णय

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज 'सुप्रीम' निर्णय, बहुमत सिद्ध करण्यासाठीचा कालावधी निश्चित होण्याची शक्यता.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर मंगळवारी सकाळी 10.30 वाजता सर्वोच्च न्यायालय राखून ठेवलेला आपला निर्णय देणार आहे. शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सरकार स्थापन केलं. त्या शपथविधीविरोधा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर दोन दिवस म्हणजे रविवार आणि सोमवार सुनावणी झाली. सोमवारी कागदपत्र सादर करण्यात आले आणि दोन्ही पक्षाकारांची बाजू न्यायालयानं ऐकून घेतली आणि आपला निर्णय राखून ठेवला आहे. दरम्यान फडणवीस सरकारकडे बहुमत आहे असा त्यांचा दावा आहे तर तातडीनं बहुमत चाचणी घ्यावी अशी मागणी महाविकासआघाडीनं न्यायालयात केली होती. न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला असून मंगळवारी सकाळी देण्यात येणार आहे. बहुमत चाचणी घेण्याबाबत आज महत्त्वापूर्ण निर्णय येण्याची शक्यता आहे.

वाचा-कोण होणार विधानसभा हंगामी अध्यक्ष? राज्यपालांकडे पाठवली 6 दिग्गज नेत्यांची नावं

सर्वोच्च न्य़ायालयात सोमवारी काय घडलं?

सोमवारी न्यायालयात देवेंद्र फडणवीस यांची बाजू मुकूल रोहतगी तर अजित पवारांच्या वतीनं वरिष्ठ अधिकवक्ता मनिंदर सिंह यांनी बाजू मांडली. महाविकासआघाडीकडून कपिल सिब्बल यांनी कोर्टात बाजू मांडली आहे.

हंगामी अध्यक्षामार्फत बहुमताची चाचणी उद्या घेऊ नका - मुकुल रोहतगी

मंगळवारी बहुमत चाचणी घेण्याची परवानगी देऊ नका - मुकुल रोहतगी

राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून 54 आमदारांच्या सह्यांचे पत्र दिले - तुषार मेहता

अजित पवारांनी दिलेले पक्ष 22 नोव्हेंबर रोजीचे आहे - तुषार मेहता

बहुमतासाठी 3 पक्षांना वेळ दिली- मेहता

9 नोव्हेंबरपर्यंत राज्यपालांनी वाट पाहिली- तुषार मेहता, महाधिवक्ता

राष्ट्रपती राजवट नको म्हणून फडणवीस यांना पाठिंबा, असं अजित पवार यांनी पत्रात म्हटलं आहे - तुषार मेहता

राष्ट्रपती राजवट जास्त दिवस रहायला नको, ही अजित पवारांची भूमिका - तुषार मेहता

'मीच राष्ट्रवादी काँग्रेस आहे. पक्षातील वाद आम्ही सोडवू,' अशी अजित पवारांची भूमिका - कोर्टात अजित पवारांचे वकिल

या प्रकरणी सविस्तर सुनावणीची गरज- तुषार मेहता

वाचा-पवारांनी स्वीकारला नाही पदभार? सिंचन घोटाळ्यातील क्लिन चीटची INSIDE स्टोरी!

भाजपच्या वतीने मुकुल रोहतगी यांनी युक्तीवाद केला होता.

एक पवार आमच्या सोबत तर दुसरे विरोधात- रोहतगी

इतर पक्षांनी आणि अपक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला- रोहतगी

निवडणूक पूर्व मित्रांनी आमची साथ सोडली- रोहतगी

बहुमत सिद्ध करण्याची तारीख कोर्ट ठरवू शकत नाही- रोहतगी

राज्यपालांनी आधीच बहुमत सिद्ध करण्याची तारीख निश्चित केली- रोहतगी

मुख्यमंत्र्यांकडे बहुमतासाठीचे संख्याबळ आहे का? कोर्टाची विचारणा

बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ 5 दिवस शिल्लक- रोहतगी

कर्नाटकासारखा कोणताही अंतरिम निर्णय देऊ नका- रोहतगी

वाचा-राऊतांनी राज्यपालांना दिलं थेट ओपन चॅलेंज, महाविकासआघाडीची सर्वात मोठी बातमी

दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर कालही सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं सर्व पक्षांना नोटीस दिली होते. आज (सोमवारी) सकाळी 10.30 वाजता तुषार मेहता यांना कागदपत्र सादर करण्याचे आदेश कोर्टानं दिले होते. त्यामुळे आज सकाळपर्यंत पाठिंब्याचं पत्र सादर करावं असं कोर्टानं सांगितलं होतं.

फडणवीस सरकारसाठी अग्निपरीक्षेचा कालावधी आज निश्चित होण्याची चिन्हं आहेत. फडणवीस सरकार बहुमत चाचणीत 145 आकडा गाठणार का? याकडे सर्वांचं लक्षं आहे.

First published: November 26, 2019, 7:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading