Home /News /maharashtra /

एकनाथ शिंदेंच्या गटाला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा, राज्यपाल अशी टाकणार पुढची पावलं?

एकनाथ शिंदेंच्या गटाला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा, राज्यपाल अशी टाकणार पुढची पावलं?

महाराष्ट्राच्या सत्तानाट्यामध्ये (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला दिलासा मिळाला आहे. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी नोटीस दिलेल्या 16 आमदारांना उत्तर देण्यासाठी 11 जुलैपर्यंतची वेळ देण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 27 जून : महाराष्ट्राच्या सत्तानाट्यामध्ये (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला दिलासा मिळाला आहे. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी नोटीस दिलेल्या 16 आमदारांना उत्तर देण्यासाठी 11 जुलैपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. या कालावधीमध्ये उपाध्यक्षांना या 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात येणार नाही. याचसोबत सुप्रीम कोर्टाने विधानसभा उपाध्यक्षांना शपथपत्रावर झालेल्या सगळ्या घटनांची विस्तृत माहिती द्यायला सांगण्यात आलं आहे. याशिवाय राज्य आणि केंद्र सरकारलाही कोर्टाने ऍफिडेव्हिट दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. बॉल आता राज्यपालांच्या कोर्टात? राज्यातल्या या सत्तासंघर्षात आता राजभवन चित्रात आलं आहे, कारण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. राज्यपालांकडे कुणी फ्लोअर टेस्टची मागणी केली, तर ते त्यांच्याकडे असलेल्या अधिकाराचा वापर करून सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगू शकतातत. सुप्रीम कोर्टात केस सुरू असताना राज्यपाल आदेश देऊ शकतात? सुप्रीम कोर्टाच्या 2016 सालच्या नबाम राबिया विरुद्ध अरुणाचल प्रदेश या निर्णयानुसार राज्यपाल फ्लोअर टेस्टला बोलावू शकतात. हा निर्णय सध्याच्या परिस्थितीसारखाच आहे. कोर्टात केस सुरू असताना राज्यपाल विधानसभेबाबत पुढची पावलं उचलू शकतात? हो, फ्लोअर टेस्टशिवाय आर्टिकल 355 नुसार राष्ट्रपती केंद्र सरकारला नियमाबाबत रिपोर्ट पाठवू शकतात, पण त्यासाठी वैध कारण असलं पाहिजे. 12 जुलैआधी राज्यपाल उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करायला सांगू शकतात? राज्यपालांकडे जर एखाद्या पक्षाने आपल्याकडे बहुमत असल्याचं पत्र दिलं तर राज्यपाल फ्लोअर टेस्ट घ्यायचे आदेश देऊ शकतात. पण राज्यपाल स्वत:च्या अधिकारात कोणालाही फ्लोअर टेस्ट पास करायला सांगू शकत नाहीत. यासाठी एखाद्या पक्षाने बहुमत असल्याचा दावा करावा लागेल.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या