Home /News /maharashtra /

आमदारांना व्हीप तर बजवाला पण... तांत्रिक मुद्द्यांमध्ये अडकणार शिवसेना?

आमदारांना व्हीप तर बजवाला पण... तांत्रिक मुद्द्यांमध्ये अडकणार शिवसेना?

शिवसेनेमध्ये (Shivsena) बंड झाल्यानंतर आता पक्षाने आमदारांवर कारवाईचा बडगा उगारायला सुरूवात केली आहे. काल शिवसेनेने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं गटनेतेपद काढून घेतलं, यानंतर आता शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांनी शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि महेश शिंदे (Mahesh Shinde) यांना नोटीस पाठवली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 22 जून : शिवसेनेमध्ये (Shivsena) बंड झाल्यानंतर आता पक्षाने आमदारांवर कारवाईचा बडगा उगारायला सुरूवात केली आहे. काल शिवसेनेने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं गटनेतेपद काढून घेतलं, यानंतर आता शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांनी शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि महेश शिंदे (Mahesh Shinde) यांना नोटीस पाठवली आहे. आज संध्याकाळी 5 वाजता वर्षा निवासस्थानी शिवसेनेची बैठक बोलावण्यात आली आहे, या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत. या बैठकीला हजर न राहिल्यास स्वेच्छेने शिवसेना पक्षाचे सदस्यत्व सोडणार असल्याचे समजून आपल्यावर भारतीय संविधान सदस्याच्या अपात्र संदर्भात असलेल्या तरतुदीनुसार कारवाई करणार असल्याचा इशारा या दोघांना देण्यात आला आहे. तांत्रिक मुद्द्यांमुळे अडकणार शिवसेना? एकीकडे शिवसेनेने हा व्हीप बजावला असला तरी तांत्रिक मुद्द्यांमुळे त्यांची अडचण होऊ शकते. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना मुंबईत बैठकीसाठी बोलावणे २ वाजता पाठवण्यात आले आहे. मुंबई गुवाहाटी रस्ते मार्गे अंतर २७३६ किमी आहे. त्यामुळे रस्ते मार्गे आमदार पोहचणे अशक्य आहे. हवाई मार्गे आमदार पोहचू शकले असते. पण तीन तासाचा कालावधी त्यासाठी थोडा कमी आहे. अशात हे बैठकीसाठी पत्र पाठवत असताना या बाबींचा विचार करण्याचा आला नव्हता का? की बंडखोर आमदारांवर कारवाई करता यावी यासाठी हा प्लान करण्यात आला असा प्र्श्न उपस्थित होत आहे. व्हीप बजावू शकतात का? एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या दोन-तृतियांशपेक्षा जास्त आमदार आहेत, त्यामुळे त्यांना हा व्हीप लागू पडणार का? यावरून पेच निर्माण होऊ शकतो. मुख्यमंत्र्यांना कोरोना मग वर्षावर बैठक कशी? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी बैठक कशी बोलावण्यात आली? आरोग्याची चिंता असल्यामुळे आम्ही बैठकीला येऊ शकत नाही, अशी पळवाटही शिवसेनेचे बंडखोर आमदार काढू शकतात.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या