महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच कायम, शिवसेनेलाही 'ऑपरेशन लोटस'ची भीती

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच कायम, शिवसेनेलाही 'ऑपरेशन लोटस'ची भीती

अजित पवारांच्या बंडानंतर सगळ्याच पक्षांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 25 नोव्हेंबर: महाराष्ट्रातला सत्ता स्थापनेचा पेच आता वेगळं वळण घेत आहे. इतके दिवस वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत असणाऱ्या भाजपने शनिवारी राजकीय वर्तुळात भूकंपाचे हादरे दिले आहेत. शनिवारी सकाळी 8 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्ममंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महाविकासआघाडीकडे बहुमत असताना आणि सत्तास्थापनेचा दावा करणार असताना आधीच भाजपने शपथविधी उरकल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने शपथविधीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. भाजपकडे सध्या 105 आमदार आहेत तर 15 अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्यानं भाजपनं 120 आमदार आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. बहुमताचा आकडा 145 असल्यानं त्यांना आणखी आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून ऑपरेशन लोटस मोहीम आखण्यात आली आहे.राज्यात राजकीय घडामोडींना वेग

ऑपरेशन लोटसच्या भीतीनं शिवसेना आमदारांना दुसऱ्या हॉटेलमध्ये हलवण्यात येणार आहे. सकाळी अकराच्या सुमारास लेमन ट्रीमध्ये नेणार असल्याची माहिती समोर आली आहे. फोडाफोडीच्या राजकारणापासून आमदारांना दूर ठेवण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीनं शिवसेनेकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

वाचा-सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ठरणार फडणवीस सरकारचं भवितव्य, आज होणार सुनावणी

आमदार फुटण्याची भीती आता शिवसेनेलाही आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. 'भाजपकडे बहुमत आहे तर ते फोडफोडीचं राजकारण का करत आहेत? भाजपने सत्तेसाठी तत्व, नीतिमत्ता गुंडाळून ठेवली आहेत. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी आहे. राष्ट्रवादीचे आमदार फोडून अजित पवार 25 ते 30 आमदार घेऊन येतील या भ्रमात फडणवीस मंडळ होते. मात्र अजित पवारांचे कथित बंड फसल्याने भाजपच्या भ्रमाचा भोपळा फुटला आहे. अजित पवारांसोबत 12 आमदार आले होते. मात्र त्यापैकी 9 आमदारांनी अजित पवारांचा हात सोडून पुन्हा शरद पवारांना साथ दिली. भाजपच्या व्यापारी वृत्तीमुळे आणि फसवणुकीच्या कलेमुळे त्यांनी शिवसेनेसारखा मित्र गमावला आता एखाद्या अट्टल चोराप्रमाणे रात्रीच्या अंधारात आमदार फोडफोडीचं राजकारण करीत आहेत.' शिवसेनेनं भाजपवर सामनाच्या आग्रलेखातून जोरदार निशाणा साधला आहे. असं असलं तरीही शिवसेनेलाही आमदार फुटण्याची भीती आहे. शिवसेनेतील अंतर्गत वाद आणि बहुमत चाचणीदरम्यान होणारं गुप्त मतदानावेळी आमदार फुटण्याची भीती शिवसेनेला आहे. त्यामुळे सेनेच्या गोटातही चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे.

वाचा-'रात्रीस खेळ चाले' पार्ट - 2, 'वर्षा'वर घेतल्या अजित पवारांच्या स्वाक्षऱ्या

शिवसेनेचे आमदार फुटणार, अजित पवारांना भेटल्यानंतर या आमदाराचा खळबळजनक दावा

अजित पवारांच्या बंडानंतर सगळ्याच पक्षांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपले आमदार हॉटेलमध्ये सुरक्षीत ठेवले आहेत. असं असलं तर कोण फुटणार याची चर्चा होतेय. राष्ट्रवादीतून बंडकरून उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यांची रविवारी अनेक आमदारांनी भेट घेतली. भाजपप्रणित अपक्ष आमदार रवी राणा यांनी रात्री अजित पवारांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी खळबळजनक दावा केला. ते म्हणाले, शिवसेनेचे अनेक आमदार अस्वस्थ असून ते फुटणार आहेत. लवकरच ते कळेल असंही त्यांनी सांगितलं.  रवी राणा यांच्या शिवाय अनेक आमदार, नेते आणि कार्यकर्त्यांनी अजित पवारांची भेट घेतली. यात भाजपच्याही आमदारांचा समावेश होता.

वाचा- ... आणि 24 तासानंतर अजित पवार पडले घराबाहेर, या ठिकाणी सुरू झाली खलबतं

काय आहे भाजपचं ऑपरेशन लोटस?

महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेचा पेच आता निर्णायक वळणावर आलाय. बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी फडणवीस यांना 30 नोव्हेंबरपर्यंतचा वेळ दिलाय. त्यामुळे बहुमतासाठी त्यांना जे संख्याबळ जमवायचं आहे त्याची जबाबदारी भाजपने काही दिग्गज नेत्यांवर सोपवली आहे. 'ऑपरेशन लोटस' यशस्वी करण्यासाठी हे चारही नेते कामाला लागले असून विधानसभेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजप आता निर्णायक लढाई लढत आहे. बहुमत जमवणं हे भाजपसाठी अतिशय प्रतिष्ठेचं झालं असून त्यासाठी काहीही करण्याची तयारी या नेत्यांनी केलीय. त्यातच मी अजुनही राष्ट्रवादीतच असून शरद पवार हेच माझे नेते आहेत असं ट्विट अजित पवारांनी केल्याने पुन्हा एकदा संभ्रम वाढला असून शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांची चिंता वाढली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 25, 2019 07:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading