Home /News /maharashtra /

'एकनाथ शिंदे फ्लोअर टेस्टसाठी जाणार नाहीत', प्रकाश आंबेडकरांनी सांगितला मोठा अडथळा

'एकनाथ शिंदे फ्लोअर टेस्टसाठी जाणार नाहीत', प्रकाश आंबेडकरांनी सांगितला मोठा अडथळा

महाराष्ट्राच्या सत्तानाट्यामध्ये (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) शिवसेनेच्या (Shivsena) 16 आमदारांना दिलासा दिला आहे, ज्यांना उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी नोटीस पाठवली होती. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या मते एकनाथ शिंदे फ्लोअर टेस्टसाठी जाणार नाहीत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 27 जून : महाराष्ट्राच्या सत्तानाट्यामध्ये (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) शिवसेनेच्या (Shivsena) 16 आमदारांना दिलासा दिला आहे, ज्यांना उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी नोटीस पाठवली होती. या नोटिसीला आज संध्याकाळी 5.30 पर्यंत उत्तर देणं या आमदारांना बंधनकारक होतं, पण सर्वोच्च न्यायालयाने हे उत्तर द्यायला 11 तारखेपर्यंतचा वेळ दिला आहे. एकनाथ शिंदे गटाला हा दिलासा मिळाल्यामुळे आता एकनाथ शिंदे गट राज्यपालांना पत्र लिहून आपण पाठिंबा काढून घेतल्याची घोषणा करू शकतात का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये एकनाथ शिंदे गटाने आपण महाविकासआघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे, असं सांगितलं आहे, पण त्यांनी राजभवनाला अजून तसं पत्र पाठवलेलं नाही. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या मते एकनाथ शिंदे फ्लोअर टेस्टसाठी जाणार नाहीत. यासाठी आंबेडकर यांनी कारणही दिलं आहे. सभागृहाच्या प्रोसिडिंग सुरू झाल्या तर आमदार बरखास्तीची कारवाई सुरू होऊ शकते, अशी भीती त्यांना वाटत असावी, कारण तसे अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहेत, ज्यात न्यायालय मध्ये येऊ शकत नाही, असं आंबेडकर म्हणाले आहेत. बैठकीला उपस्थित न राहणे हा शिवसेनेच्या घटनेमध्ये गुन्हा असेल तर उपाध्यक्ष तशी कारवाई करू शकतात. कोर्टाने हा निकाल अत्यंत विचाराने दिलेला आहे, कारण सध्या राज्यात राजकीय वातावरण शांत करण्यासाठी हा निकाल महत्त्वाचा आहे, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं. जोपर्यंत भाजप चेस बोर्डवर येत नाही, तोपर्यंत नवीन सरकार का मध्यावधी निवडणूक, याबाबत स्पष्टता येऊ शकणार नाही. तसंच आता आषाढी एकादशीची विठ्ठलाची पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच करतील, हे आता स्पष्ट झालं असल्याचं मतही त्यांनी मांडलं. सभागृहाच्या अध्यक्षांच्या कार्यकक्षेमध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकतं का नाही, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जास्त स्पष्ट करावं, या प्रकरणाचं घोंगडं जास्त काळ भिजत ठेवता येणार नाही. न्यायालयाने एण्ड लॉ पॉईंटवर स्पष्ट निकाल द्यावा, त्यामुळे एकमेकांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप होणार नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या