Home /News /maharashtra /

महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ, पण शरद पवार-कमलनाथ यांच्यात वेगळीच चर्चा

महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ, पण शरद पवार-कमलनाथ यांच्यात वेगळीच चर्चा

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना (Shivsena) आमदारांसह बंड केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते कमलनाथ (Kamal Nath) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात बैठक झाली.

    मुंबई, 22 जून : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना (Shivsena) आमदारांसह बंड केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार असल्याचा दावा केला आहे. शिंदे यांचा हा दावा खरा असेल तर त्यांच्याकडे शिवसेनेचे दोन-तृतियांश आमदार आहेत, ज्यामुळे त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचं महाविकासआघाडी सरकार धोक्यात आलं आहे, त्यामुळे काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही (NCP) वेगवान घडामोडी घडत आहेत. काँग्रेसने त्यांचे ज्येष्ठ नेते कमलनाथ (Kamal Nath) यांना राज्यात पाठवून दिलं आहे. काँग्रेस आमदारांसोबत ते चर्चा करत आहेत. तर शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची वाय.बी.चव्हाण सेंटरला बैठक घेतली. कमलनाथ यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातल्या राजकीय प्रश्नावर चर्चा होईल, हे स्वाभाविक होतं. पण शरद पवारांनी केलेल्या ट्वीटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कमलनाथ यांच्यासोबतच्या भेटीचा व्हिडिओ शरद पवार यांनी ट्वीट केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे माझी भेट घेतली. आम्ही दोघांनी येऊ घातलेल्या राष्ट्रपती निवडणुका आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली. या ट्वीटमध्ये पवारांनी महाराष्ट्रातल्या घडामोडींचा उल्लेखही केलेला नाही, त्यामुळे पवारांच्या मनात नेमकं काय आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena, Uddhav thackeray, शरद पवार. sharad pawar

    पुढील बातम्या