Home /News /maharashtra /

शिवसेनेत गळती सुरूच, 12 तासांमध्ये 10 आमदार गुवाहाटीत, 'शिंदे'शाही वाढली!

शिवसेनेत गळती सुरूच, 12 तासांमध्ये 10 आमदार गुवाहाटीत, 'शिंदे'शाही वाढली!

महाराष्ट्रातल्या राजकीय भूकंपाला आता चार दिवस उलटून गेले आहेत, पण शिवसेनेला (Shivsena) लागलेली गळती काही केल्या कमी होत नाहीये. मागच्या 12 तासांमध्ये शिवसेनेचे 8-10 आमदार गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. तर आणखी काही आमदार दाखल होण्याची प्रतिक्षा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला आहे.

पुढे वाचा ...
    गुवाहाटी, 23 जून : महाराष्ट्रातल्या राजकीय भूकंपाला आता चार दिवस उलटून गेले आहेत, पण शिवसेनेला (Shivsena) लागलेली गळती काही केल्या कमी होत नाहीये. मागच्या 12 तासांमध्ये शिवसेनेचे 8-10 आमदार गुवाहाटीमध्ये (Guwahati) दाखल झाले आहेत. तर आणखी काही आमदार दाखल होण्याची प्रतिक्षा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला आहे. काही आमदार सूरतवरून गुवाहाटीला येणार असल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान आज सकाळी 10 वाजता एकनाथ शिंदे यांनी आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar), सदा सरवणकर (Sada Sarvankar) हे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेले आमदार तर आशिष जयस्वाल हे अपक्ष आमदार काही वेळापूर्वीच गुवाहाटीला पोहोचले आहेत. याआधी काल रात्री गुलाबराव पाटील आणि योगेश कदम हे शिवसेनेचे आमदार तसंच मंजुळा गावित, चंद्रकांत पाटील हे अपक्ष आमदार गुवाहाटीमध्ये पोहोचले. आमदार नॉट रिचेबल दुसरीकडे दादा भुसे (Dada Bhuse), दीपक केसरकर (Deepak Kesarkar), संजय राठोड (Sanjay Rathod) आणि दिलीप लांडे (Dilip Lande)हे नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे. पक्षांतर बंदी कायद्याच्या कारवाईतून वाचायचं असेल तर शिंदे गटामध्ये शिवसेनेचे दोन-तृतियांश आमदार असणं गरजेचं आहे. म्हणजेच शिवसेनेच्या 55 आमदारांपैकी 37 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणं गरजेचं आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Eknath Shinde, Maharashtra News, Maharashtra politics, Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या