मुंबई, 28 जून : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) राजकीय भूकंप झाल्यानंतर आता 8 दिवसांनी भाजपची अधिकृतरित्या एण्ट्री झाली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपचे (BJP) नेते राज्यपालांना भेटायला गेले. महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) सरकार अल्पमतात आहे, त्यामुळे बहुमताची चाचणी घ्यावी, अशी मागणी भाजपने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे केली आहे. आता राज्यपाल यावर कोणता निर्णय घेतात, तसंच राज्यपाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी तारीख देणार का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.
महाविकासआघाडी सरकार काय करणार?
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्याची तारीख दिली तर सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जाणार हे निश्चित आहे. हाच मुद्दा सोमवारी झालेल्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्येही उपस्थित करण्यात आला. विधानसभा उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या 16 आमदारांवर कारवाई करू नये, असा आदेश दिला. कोर्टाने हा आदेश दिल्यानंतर वकिलांनी मधल्या काळात बहुमताची चाचणी घ्यायला सांगितली तर काय करायचं? असा प्रश्न विचारला. यावर बोलताना कोर्टाने ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत त्यावर निर्णय कसा द्यायचा म्हणून उत्तर दिलं. तसंच बहुमत चाचणीची परिस्थिती उद्भवली तर पुन्हा कोर्टात या सांगितलं.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.