• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Maharashtra Political crisis Live Updates : मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग, 'सिल्व्हर ओक'वर बैठक

Maharashtra Political crisis Live Updates : मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग, 'सिल्व्हर ओक'वर बैठक

महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडींचे आणि राजकीय उलथापालथीचे ताजे अपडेट्स LIVE पाहा

 • News18 Lokmat
 • | June 24, 2022, 21:00 IST
  LAST UPDATED 20 HOURS AGO

  हाइलाइट्स

  22:56 (IST)

  गुवाहाटीतील शिंदे गटाची बैठक संपन्न
  'आपापल्या मतदारसंघांत मेळावे घ्यावेत'
  'बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार पुढे न्या'
  आपण शिवसेनेतच आहोत - शिंदे गट
  आपल्याबद्दलचे गैरसमज दूर करा - शिंदे गट
  सगळ्या कार्यकर्त्यांना एकसंध ठेवा - शिंदे गट
  'हिंदुत्व, मराठी या भूमिकेवर आपण कायम'
  शिंदेंचेही आमदारांना बैठका, मेळाव्याचे आदेश

  22:41 (IST)

  मुख्यमंत्री ठाकरेंचं नगरसेवकांना मार्गदर्शन
  शिवसेना ही मर्दांची सेना - उद्धव ठाकरे
  कॉंग्रेस-राष्ट्रवादी आपल्यासोबत - उद्धव ठाकरे
  'पक्षानं दिलेला उमेदवार तुम्ही निवडला'
  तुमच्यामुळे हे लोक निवडून आले - उद्धव ठाकरे
  'आपल्याच लोकांनी पाठीत खंजीर खुपसला'
  शिवसेनेत गद्दार नकोत - उद्धव ठाकरे
  तुम्ही निष्ठेनं सेनेसोबत राहिलात - उद्धव ठाकरे
  सीएम भेटत नाही अशा तक्रारी - उद्धव ठाकरे
  'एकनाथ शिंदेंची अनेकदा समजूत घातली'
  'भाजपात जाण्यासाठी आमदारांचा शिंदेंवर दबाव'
  'मातोश्री' हे तुमचं मंदिर आहे - उद्धव ठाकरे
  'विश्वासघातकी भाजपसोबत कसं जायचं?'
  'गुवाहाटीत गेलेले आमदार खूश नाहीत'
  फुटून गेलेले पुन्हा निवडून येतील का? - मुख्यमंत्री
  'निवडून आलेल्यांना फोडू शकाल, देणाऱ्यांना नाही'
  'शेराला सव्वाशेर भेटतोच आणि आता वेळ आलीय'
  'शिवसेना संपवण्यासाठी डाव आखला जातोय'
  मोह सोडलाय, जिद्द नाही सोडली - उद्धव ठाकरे
  शिवसेना तलवारीसारखी - उद्धव ठाकरे
  'शिवसेना पाठीमागून वार करत नाही'
  'शिंदे गटाला भाजपात जाण्याशिवाय पर्याय नाही'
  जाणाऱ्यांना दरवाजा मोकळा आहे - उद्धव ठाकरे
  शिवसैनिक हेच माझं खरं वैभव - उद्धव ठाकरे
  पुन्हा एकदा शिवसेना उभी करेन - उद्धव ठाकरे

  22:38 (IST)

  नरहरी झिरवळ-महाधिवक्त्यांची बैठक संपन्न
  '16 बंडखोर आमदारांना नोटीस देणार'
  'आमदारांना 48 तासांत उत्तर द्यावं लागेल'
  नरहरी झिरवळांसोबतच्या बैठकीत निर्णय

  22:28 (IST)

  नरहरी झिरवळ-महाधिवक्त्यांची बैठक संपन्न
  16 आमदारांवर कारवाई करण्याच्या हालचाली
  'बंडखोर आमदारांना उद्यापासून नोटीस देणार'
  'आमदारांना 48 तासांत उत्तर द्यावं लागेल'
  नरहरी झिरवळांसोबतच्या बैठकीत निर्णय

  22:14 (IST)

  'मातोश्री'वरची खासदारांची बैठक संपन्न
  'शेवटपर्यंत सरकार आपणच टिकवणार'
  'पवारांनी उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केला विश्वास'
  फ्लोअर टेस्टपासून ते कोर्टाच्या लढाईचा आढावा

  22:7 (IST)

  शिवसेना भवनात नगरसेवकांसोबत बैठक
  आदित्य ठाकरेंचं ऑनलाईन मार्गदर्शन
  जिंकण्याचा निर्धार कायम - आदित्य ठाकरे
  'शिंदे गटातील 50 टक्के आमदार सोबत'
  सुरतला जाऊन बंड कशासाठी? - आदित्य
  स्वत:च्या भवितव्याचा विचार करावा - आदित्य
  आपण लढत राहायचं, जिंकायचं - आदित्य
  जे सोबत राहिले ते आपले - आदित्य ठाकरे
  जे सोडून गेले ते विरोधक - आदित्य ठाकरे
  आमदार परतले तर शिवसेनेत घेऊ - आदित्य
  'मविआ सरकार पडणार नाही याची खात्री'
  'देशभरात उद्धव ठाकरेंच्या कामाचं कौतुक'
  नाराजीबाबत चर्चा करायला हवी होती - आदित्य
  'सीएम आजारी असताना बंडाचा पवित्रा घेतला'

  22:6 (IST)

  नरहरी झिरवळ-महाधिवक्त्यांची बैठक संपन्न
  तब्बल साडेचार तास बैठकीत खलबतं
  16 आमदारांवर कारवाई करण्याच्या हालचाली

  22:3 (IST)

  उद्या स.11 वा. भाजप कोअर कमिटीची बैठक
  संघटनात्मक स्थितीचा भाजप आढावा घेणार
  मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार हजर राहणार
  भातखळकर, अमित साटम उपस्थित राहणार

  20:52 (IST)

  पवारांच्या 'सिल्व्हर ओक'वर काही वेळात बैठक
  NCPचे महत्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार

  20:50 (IST)

  शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी थोड्याच वेळात बैठक सुरू होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत

  महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडींचे आणि राजकीय उलथापालथीचे ताजे अपडेट्स LIVE पाहा